Nashik

दिंडोरी तालुक्यातीलजानोरी गावाने लोकवर्गणीतून घेतली रुग्णवाहिका

दिंडोरी तालुक्यातीलजानोरी गावाने लोकवर्गणीतून घेतली रुग्णवाहिका

नाशिक विभागीय प्रतिनिधी सूनील घुमरे

कोरणा काळात रुग्णवाहिका धारकांनी अवाजवी पैसे घेतल्याने घेतला निर्णय
दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावाने लोकवर्गणी गोळा करून गावाच्या सेवेसाठी घेतलीं रुग्णवाहिका कोरोना काळात अनेक रुग्णांकडून रुग्णवाहिका धारकांनी जादा भाडे घेतल्यामुळे जानोरी ग्रामस्थांनी स्थानिक ओ आपल्यासाठी व परिसराचा होणारा विकास या दृष्टिकोनातून अत्यावश्यक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला
दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात कोरुना काळात गावातील एका तरुण तडफदार कार्यकर्ता कै. सोमनाथ घुमरे यांचे नाशिक येथे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांचे शव जानोरी येथे आणण्यासाठी ॲम्बुलन्स चालकाने दहा हजार रुपये घेतले होते. त्यामुळे गावातील तरुण वर्गाने एकत्र येऊन आपण गावासाठी रुग्णवाहिका घेणे गरजेचे असून आपल्या गावची लोकसंख्या जवळपास पंधरा हजाराच्या आसपास असल्याने व परिसरात कामानिमित्ताने औद्योगिक वसाहत विमानतळ किंवा अन्य काही कामाच्या साठी येणाऱ्या नागरिकांना केव्हा काय होईल काही सांगता येत नाही व या परिसरात नेहमीच एक्सीडेंट च्या घटना घडतात त्यामुळे येथील तरुण वर्गाने रुग्णवाहिका घेणेबाबत आपण एकजूट करून सोशल मीडियाद्वारे आपल्या गावातील नागरिकांनाही कल्पना देऊन म्हणून निर्णय घेऊन अशा प्रकारचा मेसेज टाकला व या निर्णयाला ग्रामस्थांसह परिसरातून चांगली कल्पना असल्याने सर्वांनी होकार दिला यात परिसरातील नागरिक तसेच वाडी वस्त्यांवर राहणारे आदिवासी वस्त्यावर अनेक तरुण वर्गाने घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्यात आली. त्यामुळे चार ते पाच महिन्यातच अंबुलान्स साठी पैसे जमा झाल्यामुळे जानोरी ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण झाले असून अनेक गोरगरीबाचीं रुग्णसेवेची संधी प्राप्त झाली आहे.व खऱ्या अर्थाने सामाजिक भान ठेवून योग्य निर्णय घेतला

प्रतिक्रिया

कोरोना काळात अनेक गोरगरिबांची ॲम्बुलन्स वाल्याकडून लूट झाली होती. त्यामुळे आम्ही गावातील तरुण वर्ग एकत्र येऊन गावातून लोकवर्गणी गोळा करून गोरगरिबांच्या सेवेसाठी एक ॲम्बुलन्स खरेदी करण्याचा निश्चय केला होता तो आज निश्चय आमचा पूर्ण झाला असून गोरगरिबांची खूप मोठी अडचण दूर झाली आहे

. हर्षल आबाजी काठे

को बीड काळात सर्वसामान्य माणसावर येणारा दुःखद प्रसंग व रुग्णवाहिकेचे चालकांकडून होणारे बेसुमार अवाजवी आर्थिक मागणी यामुळे खऱ्या अर्थाने समाजसेवेची कल्पना सुचली व ती प्रत्यक्षात साकार झाले हाच सामान्यांचा आनंद

ज्ञानेश्वर डवणे सामाजिक कार्यकर्ता भाजपा

प्रतिक्रिया

जानोरी गाव हे खूप मोठ्या लोकसंख्येचे गाव असल्यामुळे जानोरी गावासाठी ॲम्बुलन्सची खूप मोठी गरज होती. अनेक गोरगरिबांना दवाखान्यात जाण्यासाठी खाजगी गाडीचा वापर करावा लागत होता. त्यामुळे अनेक गोरगरिबांचे पैसे जात होते. तसेच वेळेवर ॲम्बुलन्स मिळाली नसल्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले होते.त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतुन ॲम्बुलन्स खरेदी केली.

गणेश तिडके

माजी उपसरपंच जानोरी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button