Manchar

आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

दिलीप आंबवणे मंचर

मंचर : मंचर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा- आंबेगाव चा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षक समिती दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबवत असते.
यावेळी कार्यक्रमात गुणवंत शिक्षक पुरस्कार व कोव्हिड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेगाव तालुका पं.समितीचे चे सभापती श्री.संजय गवारी साहेब हे होते व प्रमुख पाहुणे माजी उपसभापती पं.स आंबेगाव नंदकुमार सोनावले, दत्ताभाऊ गांजाळे सरपंच मंचर व सौ.संचिता अभंग मँडम गटशिक्षणाधिकारी पं.स.आंबेगाव व राजेश ढोबळे सरचिटणिस पुणे जिल्हा शिक्षक समिती हे होत.
यावेळी जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षक बांधवांचे राजेंद्र बेंढारी, वामन गभाले, सचिन लोहकरे मनोज केंगले, पोपट बेंढारी, डामसे सर, तुरे सर, रोहीदास गवारी व सीमा गवारी यांचे शिक्षक समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
गुणवंत शिक्षक व कोव्हिड योद्धा पुरस्कार पुढील प्रमाणे-
साहेबराव शिंदे – केंद्रप्रमुख साकोरे, नारायण चित्ते विषयतज्ञ, सोमनाथ लोहकरे शाळा-तिरपाड, विकास कानडे शाळा -असाणे, बाळू गभाले शाळा-नानवडे, काळूराम बोकड शाळा-बोरघर, सावळेराम आढारी शाळा-तळेघर, यमना साबळे शाळा – राजेवाडी, मंदाकिनी इष्टे शाळा – वाल्मिकवाडी, ऊर्मिला उगले शाळा – पाडाळवाडी, किसन तळपे शाळा -मायंबावाडी, रुपाली बांबळे शाळा -कानसे, तुकाराम लेंभे शाळा आमोंडी, सोनल कोकणे शाळा-गवारवाडी, ज्ञानेश्वर जाधव शाळा – कडेवाडी, अपर्णा शिनलकर शाळा – महाळुंगे पडवळ, अशोक कडाळे शाळा कोळवाडी, मोनिका वाडेकर शाळा-लांडेवाडी, शाईन इनामदार शाळा-मंचर नं १, वैशाली भोंडवे शाळा-थुगाव,अपूर्वा शेटे शाळा-अवसरी नं ३,भगवंत टाव्हरे शाळा – भराडी,नवनाथ सिनलकर-शाळा शिंगवे, सौ.नंदिनी पडवळ शाळा चांडोली बु!, मच्छिंद्र चासकर शाळा-पिंपळगाव तर्फे महाळुंगे, संजय घोटकर शाळा काठापूर, विजया हिंगे शाळा – धामणी, सुधिर पारधी शाळा साबळेवाडी यांना गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले.
त्यावेळी सभापती संजय गवारी ,माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, मंचर नगरीचे सरपंच दत्ताभाऊ गांजाळे, गटशिक्षणाधिकारी सौ. संचिता अभंग व शालेय व्यवस्थापन समिती थोरांदळे चे अध्यक्ष रमेश टेमगिरे यांना प्रातिनिधीक स्वरुपात कोव्हिड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले.
तसेच शिक्षक समितीच्या वतीने तालुक्यातील सर्वच अधिकारी व पदाधिकारी यांनी कोरोनाकाळात उत्कृष्ट नियोजन करुन या महामारीला पायबंद करण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल समितीचे पदाधिकारी प्रत्यक्ष घरी जावून त्याचा कोव्हिड योद्धा म्हणून सन्मान करणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक समिती नेते सुरेश लोहकरे, अध्यक्ष ठकसेन गवारी,महिला अध्यक्षा अलका कोळप, सरचिटणीस राजेद्र शेळकंदे, कार्याध्यक्ष सोनवणे, कोष्याध्यक्ष अरविंद मोढवे, संपर्क प्रमुख प्रकाश गोफणे, माजी अध्यक्ष संतोष राक्षे, जिल्हा प्रतिनिधी मधूकर भारमळ, चंद्रकांत मडके, सखाराम वाजे, कल्पना बो-हाडे व राज्य कार्येकारणी सदस्य संतोष कृष्णा गवारी यांनी केले.
यावेळी मनोज सरदार सर,डामसे सर ,नंदकुमार शेळके ,रामकिसन गवारी, मोघा गवारी उपस्तित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश ढोबळे यांनी केले, संतोष कृष्णा गवारी यांनी सुत्रसंचालन केले व अध्यक्ष टि.जे.गवारी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Back to top button