India

अमेझॉन..कढीपत्ता….गांजाची तस्करी की फोडणी..!

अमेझॉन..कढीपत्ता….गांजाची फोडणी..!

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट ऍमेझॉनच्या माध्यमातून गांजाची मोठी तस्करी उघडकीस आली आहे. या मोठ्या रॅकेटचा खुलासा करताना पोलिसांनी २० किलो गांजासह दोघांना ताब्यात घेतले आहे. ते दोघेही कढीपत्त्याच्या नावाखाली गांजाची तस्करी होत होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गांजाची ही खेप विशाखापट्टणम येथून मध्य प्रदेशात ऍमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून आयात करण्यात आली होती. आरोपींनी प्राथमिक चौकशीत सांगितले की, आतापर्यंत सुमारे १ टन गांजा ऍमेझॉनच्या माध्यमातून तस्करी करण्यात आला आहे.
गांजासह पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन जणांपैकी एकाची ओळख सुरज उर्फ कल्लू (मूळ ग्वाल्हेरमधील मोरार) आणि पिंटू उर्फ बिजेंद्रसिंग तोमर (भींड जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला ढाबा चालवणारा) अशी आहे. या घटनेमुळे संपुर्ण परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
२० किलो गांजाची ही खेप ऍमेझॉनच्या माध्यमातून विशाखापट्टणम येथून मागवण्यात आली होती. भिंड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, पकडलेल्या लोकांच्या चौकशीत असे दिसून आले की गेल्या चार महिन्यांपासून प्रमुख ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मद्वारे प्रतिबंधित अंमली पदार्थ आयात केले जात आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button