World

Amazing World:असे रेस्टॉरंट जिथे विवस्त्र जावं लागतं..! जाणून घ्या जगातील 5 विचित्र रेस्टॉरंट बदल…

Amazing World:असे रेस्टॉरंट जिथे विवस्त्र जावं लागतं..! जाणून घ्या जगातील 4 विचित्र रेस्टॉरंट बदल…

जगात अनेक विचित्र गोष्टी लोक आणि प्रथा अस्तित्वात आहेत.तस पाहिलं संपूर्ण जगच विचित्र घटनांनी पुरेपूर भरलेलं आहे.आपण नेहमी सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही गोष्टींवर विशेष लक्ष देतो. आपले कपडे हासुद्धा त्याचाच एक भाग. पेहरावाच्या बाबतीत कायमच आपण सर्वजण सजग असतो. पण, तुम्हाला कोणी म्हटलं सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र या तर? ..चला तर जाणून घेऊ जगातील 5 विचित्र रेस्टॉरंट..!

1. हे ऐकायलाच तुम्हाला अतिशय विचित्र वाटेल. पण, लंडनमध्ये एक असं Restaurant आहे. जिथं लोक कपडे काढून जेवण जेवतात.
‘दी बुनियादी’ ( Nude Restaurant, London) या नावाने ओळखलं जाणारं हे आहे जगातील पहिलं न्यूड रेस्तराँ.
2016 मध्ये याची सुरुवात झाली. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण इथं शेफ, वेटरसह सर्वजण विवस्त्रच खाणं शिजवतात, हे वाढतात आणि खाणारेही ते विवस्त्रच खातात.

2. न्योताईमोरी (Nyotaimori or Naked-Sushi Restaurants, Japan) म्हणजेच एका स्त्रीच्या शरीरावर वाढलेलं जेवण. या हॉटेलमध्ये बॉडी सुशी देण्यात येते.
जिथं सुशी सा हा पदार्थ चक्क काही तरुणींच्या शरीरावर ठेवून वाढण्यात येतो. त्या मुलींच्या चारही बाजूंना बसून लोक या पदार्थाचा आनंद घेतात. जपानमधील ही पद्धत बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे.

3.Prison Theme Restaurant, China चीनमधील हे रेस्तराँ तेथील खास सेवेसाठी प्रसिद्ध आहे. इथं एका कारागृहात तुम्हाला जेवण दिलं जातं. वेटर आणि इतर मंडळी अथं कैदी आणि जेलरच्या रुपात वावरत असतात.

4. सहसा वॉशरुमचा वापर कोणत्या गोष्टींसाठी होतो हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण, तैवानमध्ये एक असं हॉटेल आहे, जिथं तुम्हाला खुर्चीवर नाही, तर टॉयलेट सीटवर बसवण्यात येतं. तिथेचट बसून तुम्ही जेवणाचा आनंद घेणं अपेक्षित असतं.

5. Restaurant In Air, Belgium) बेल्जियममधील एक हॉटेल असं आहे, जे हवेत तरंगत म्हणा किंवा लटकत म्हणा पण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. आहे की नाही, एकदम जगावेगळा अनुभव?

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button