Aurangabad

गजब महावितरण अजब कारभार

गजब महावितरण अजब कारभार

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील जातेगाव टेंभी शिवारातील गट क्रमांक 19 मध्ये विहीर वरती विद्युत पुरवठा न करता २१०९० रुपये विद्युत देयक देण्याचा प्रताप महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणातून हा प्रकार घडला.

या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जातेगाव टेंभी शिवारातील शेतकरी महिला लताबाई दिगंबर मलिक यांच्या गट क्रमांक 19 मधील विहीरीच्या विद्युत मोटरीसाठी विद्युत पुरवठा हवा होता, त्यासाठी दिनांक 26/08/2016 रोजी ग्राहक क्रमांक 500430006072 व कोटेशन (डिमांड नोट)
रूपये 6300 असे भरुन रितसर विद्युत पुरवठा हवा यासाठी अर्ज केला होता. विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी विहिरीपासून ४०० ते फुट लांब विद्युत खांबाचे अंतर असून दोन विद्युत खाबांची आवश्यकता आहे. बेजबाबदार महावितरण कंपनीने विद्युत खांब न लावता. आजपर्यंत लताबाई दिगंबर मलिक यांच्या विहीरी वर
विद्युत पुरवठा करण्यात आलेला नाही. मीटर सुद्धा बसविण्यात आले नाही. तरीपण या ग्राहकाला महावितरण कंपनीने 11 मे 2019 रोजी 1416 युनिट वापराचे 9800 रुपयांचे व आज 11 मे 2021 रोजी 2343 युनिट वापराचे 21090 रुपये ( एकवीस हजार नव्वद रूपये ) चा वीज देयक पाठवून बेजबाबदार कारभाराचा कळस गाठला आहे.

महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार झाला आहे. तसाही शहर व तालुक्यात विद्युत बिलाचा घोळ नेहमीचाच झाला आहे. काहीही कारण नसताना वीजेचा कमी वापर करणार्‍या ग्राहकांना जास्तीचे बील दिले जात आहे. विजेची चोरी करणाऱ्यांना सवलत व इमानदारीने भरणा करणाऱ्यांकडून आकारणी या धोरणाचा अवलंब होत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. कधी फॉल्टी मीटर तर कधी तांत्रिक कारण सांगून ग्राहकांची पिळवणूक केली जात आहे. अशी संतप्त प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या संदर्भात महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालावे अशी मागणी लताबाई दिगंबर मलिक मोहेकर यांनी केली आहे.

अॅड. कैलास खांडबहाले शेतकरी नेते यांनी या संदर्भात एम एस ई बी चे अधिकारी गुंगीमध्ये काम करतात का? ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पोल चा पत्ता नाही त्याला 25 हजार लाईट बिल देतात हे अधिकारी यावरून एम एस ई बी चा सावळा गोंधळ लक्षात येतो. त्या अधिकार्‍यांवर कारवाई साठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना भेटणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button