Maharashtra

Breking जळगाव कारागृहातून दरोडेखोर पोलिसासह, अमळनेरचे दोन अट्टल गुन्हेगार फरार!

जळगाव कारागृहातून दरोडेखोर पोलिसासह, अमळनेरचे दोन अट्टल गुन्हेगार फरार

कारागृह सुरक्षा व्यवस्थेचे
पहाटे पहाटे धिंडवडे!

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

जळगाव जिल्हा कारागृहातून तीन आरोपी पळाल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजता घडली.

दरोड्यातील आरोपी असलेला पोलीस सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गोरव विजय पाटील रा.तांबापुरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड’अमळनेर) असे पळालेल्या आरोपींची नावे आहेत.
सुशील मगरे हा पोलीस दलातून बडतर्फ झालेला आहे. पुणे येथील सराफ दुकानावर शस्त्रांचा धाक दाखवून त्याने दरोडा टाकला होता. एलसीबीच्या पथकाने त्याला डिसेंबर २०१९ मध्ये बडोदा येथून अटक केली होती.
या तीनही आरोपींचे जिल्हा कारागृहात साटेलोटे झाले असावेत किंवा या पूर्वी देखील ते एकदुसऱ्याशी मिळालेले असावेत अशी शंका नाकारता येत नाही.
अनेक गुन्हे उजेडात आणून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांच्या परिश्रमावर कारागृह सुरक्षा यंत्रणेने पाणी फिरवले असून जिल्हा कारागृहात सुरक्षा व्यवस्था पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button