Amalner

Amalner:250 वर्षांची परंपरा असलेल्या यात्रोत्सवास सुरुवात…विठ्ठल रुख्मिणी संस्थान सह प्रशासन सज्ज…नागरिकांनी शिस्त व नियमांचे पालन करावे..गादी पुरुष श्री ह भ प प्रसाद महाराजांचे आवाहन…

Amalner:250 वर्षांची परंपरा असलेल्या यात्रोत्सवास सुरुवात…विठ्ठल रुख्मिणी संस्थान सह प्रशासन सज्ज…नागरिकांनी शिस्त व नियमांचे पालन करावे..गादी पुरुष श्री ह भ प प्रसाद महाराजांचे आवाहन

अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रे ला प्रारंभ झाला असून कोरोना च्या काळात गेल्या 2 वर्षात यात्रोत्सव बंद होता. त्यामुळे या यात्रोत्सवास लोकांचा सहभाग व उत्साह मोठ्या प्रमाणात असणार आहे. विठ्ठल रुख्मिणी संस्थान अमळनेर यात्रे साठी सज्ज असून जनता व प्रशासन देखील सज्ज आहे.

?? दि 12 मे वैशाख शु ११ मोहिनी एकादशी गुरुवार रोजी मुख्य रथोत्सव संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.यावेळी विविध कला प्रदर्शन असून यात आदिवासी सांस्कृतिक कला मंडळ नाशिक हे सहभागी होतील.

?? दि 15 मे 2022 वैशाख शुभ १४ सद्गुरू सखाराम महाराज पुण्यतिथी निमित्त सर्व रोगनिदान शिबीर वाडी चौक अमळनेर येथे सायं 5 ते 7 या वेळेत होईल.

?? दि 16 मे 2022 रोजी वैशाख शु १५ पालखी सोहळा सकाळी 7 ते 2 या वेळात असेल.

?? दि 17 मे रोजी सकाळी 10 ते 12 वाजता ह भ प मोहन महाराज बेलापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल.

या पार्श्वभूमीवर आज वाडी संस्थानात पत्रकार परिषदेत गादि पुरुष संत प्रसाद महाराज यांनी जनतेला आवाहन केले आहे की

प्रत्येक नागरिकाने ही यात्रा आपली यात्रा म्हनून अनुभवावी.प्रत्येक नागरिकाने शिस्त व नियमांचे पालन करावे. कोणीही गैर व्यवहार अथवा यात्रेस गालबोट लागेल असे वर्तन करू नये.सर्व परिसरात cctv ची करडी नजर राहणार असून गैरप्रकाराला यामुळे आळा बसेल.संस्थानाने संपूर्ण यात्रा परिसरात cctv लावले आहेत.आपला हा परंपरागत यात्रोत्सव सर्वांनी आनंदाने,भक्तिभावाने, अध्यात्मिक वातावरणात साजरा करावा. सामाजिक तेढ निर्माण होईल असे वर्तन करू नये. सामाजिक ऐक्य आणि सलोखा टिकवून ठेवून ही प्राचीन परंपरा जपावी असे देखील त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

Amalner:250 वर्षांची परंपरा असलेल्या यात्रोत्सवास सुरुवात...विठ्ठल रुख्मिणी संस्थान सह प्रशासन सज्ज...नागरिकांनी शिस्त व नियमांचे पालन करावे..गादी पुरुष श्री ह भ प प्रसाद महाराजांचे आवाहन...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button