Amalner

Amalner: स्काँलरशिप परीक्षेत मराठी माध्यमातून जिल्ह्यात प्रथम आलेला यशमित खैरनारचा सत्कार….

Amalner: स्काँलरशिप परीक्षेत मराठी माध्यमातून जिल्ह्यात प्रथम आलेला यशमित खैरनारचा सत्कार….

अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर येथील इयत्ता पाचवीतील यशमित समाधान खैरनार स्काँलरशिप परीक्षेत मराठी माध्यमातून जिल्ह्यात प्रथम आला तर आरूष हेमंतकुमार बाविस्कर इयत्ता 5 वी मराठी माध्यम जिल्ह्य़ात दुसरा व
रिया योगेश जाधव तालूक्यात 7 वी आली त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सविस्तर वृत्त असे की यशमित समाधान खैरनार हा स्काँलरशिप परीक्षेत जिल्ह्यात मराठी माध्यमातून मुलांमध्ये प्रथम तर अमळनेर तालुक्यातही प्रथम आला आहे, त्याला 300 पैकी 250 गुण मिळाले. त्याला शाळेतील मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक व आईवडील सौ तृप्ती खैरनार व समाधान खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि नियमित अभ्यास, प्रश्नपत्रिकेचा सराव, आई-वडिलांचे योग्य मार्गदर्शन व शाळेतील शिक्षकांचे व श्री क्लासेचे संचालक यांचे मार्गदर्शन यामुळे आम्हाला यश मिळाले.
देवगांव देवळी येथील माध्यमिक शिक्षक तथा पत्रकार ईश्वर महाजन यांनी यशमित व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button