Amalner

Amalner:का थुंकला हे विचारताच त्याने खाल्ला मार..!

Amalner:का थुंकला हे विचारताच त्याने खाल्ला मार..!

अमळनेर मोटारसायकलवर गुटखा खाऊन का थुंकला असे विचारताच दोन जणांनी
रामकृष्ण यास काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील गांधली ह्या गावात घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामकृष्ण नामदेव पवार हा गांधली येथे वास्तव्यास आहे. त्याचे दुचाकी वाहन क्र एमएच- 19 , डीटी828 ही अंगणात लावलेली होती.त्यावेळी संतोष पाटील याने गुटखा खाऊन गाडीवर थुंकला.तेंव्हा रामकृष्ण पवारने गाडीवर का थुंकला असे विचारले.याचा राग येऊन संतोष त्याच्या वडिलांना घेऊन आला. ह्या दोन्ही पिता पुत्राने काठ्यांनी रामकृष्ण यास कपाळावर मारहाण व शिवीगाळ केली.रामकृष्ण ने दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम पाटील करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button