Amalner

Amalner: किराणा घ्यायला गेला पण परत आलाच नाही..!रस्त्यातच गाठले मृत्यूने..!

Amalner: किराणा घ्यायला गेला पण परत आलाच नाही..!रस्त्यातच गाठले मृत्यूने..!

अमळनेर तालुक्यातील गलवाडे येथील रहिवासी तरूण किराणा व भाजीपाला घेण्यासाठी म्हणून घरातून निघाला पण परत घरी परतला नाही.परतले ते त्याचे शव..! भाजीपाला घ्यायला निघालेला मनोहर पाटील च्या मोटरसायकलला ट्रक ने उडविले व ह्या तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि 6 जाने रोजी सकाळी गलवाडे रस्त्यावर अंबिका मंगल कार्यालयाजवळ घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की मनोहर रतन पाटील रा गलवाडे हा दि 6 जाने रोजी सकाळी 8 वाजता मोटरसायकलवर भाजीपाला व किराणा घेण्यासाठी घरातून निघाला. अंबिका मंगल कार्यालया जवळ समोरून येणाऱ्या ट्रक क्र एमएच-18 , एए-7991 ने त्याच्या मोटरसायकलला जोरात धडक दिली.त्यामुळे मनोहर मोटरसायकलसह खाली रस्त्यावर पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मोटरसायकलचे बंफर, हेडलाईट, पुढचे चाक, पेट्रोल टाकी व इंजिन इ चे नुकसान झाले. अपघात होताच ट्रक चालक पळून गेला. प्रभाकर दौलत पाटील यांनी अपघाताची माहिती मनोहरचे वडील रतन काशीराम पाटील यांना दिली.त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button