Amalner

अमळनेर: साने गुरुजी फाऊंडेशन तर्फे संविधान दिनानिमित्त मतदान जन जागृती अभियान

अमळनेर: साने गुरुजी फाऊंडेशन तर्फे संविधान दिनानिमित्त मतदान जन जागृती अभियान

अमळनेर साने गुरुजी फौंडेशन, खान्देश विकास प्रतिष्ठाण, आधार संस्था, श्रम साध्य संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, महिला व बाल विकास विभाग जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा ,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक अमळनेर, येथे दि 26 नोहेंबर 2021 रोजी मतदान जन जागृती अभियान कार्यक्रम राबविण्यात आला, या वेळी देह विक्री करण्याऱ्या महिला, अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची रूपरेषा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.विजयसिंग परदेशी यांनी केली .कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अमळनेर प्रांत अधिकारी सिमा अहिरे यांनी व तहसीलदार मिलिंद वाघ यांनी मतदानाचे फायदे व संविधान दिना बद्दल माहिती दिली. या वेळी संविधान दिन निमित्ताने जगदिश पाटील यांनी संविधान चे वाचन सामूहिक वाचन केले. संस्था चे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वन स्टॉप सेंटर (महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार बद्दल)माहिती दिली. या वेळी आधार संस्थेच्या अध्यक्ष भारती पाटील,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार आदिवासी एकता संघर्ष समिती च्या प्रदेशाध्यक्षा प्रा जयश्री साळुंके- दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले तर रेणू प्रसाद, श्रम साध्य संस्था चे गौरव माळी, जयेश माळी, शरद पाटील,जगदिश पाटील,पवन साळुंखे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button