Amalner

Amalner: ऍड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण शिबीर संपन्न

Amalner: ऍड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण शिबीर संपन्न

अमळनेर येथे ऍड ललिता पाटील शाळेत विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. शिबिराची औपचारिक सुरुवात शाळेचे संचालक पराग पाटील, देवेश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांच्या नावाची संगणकावर नोंदणी करून करण्यात आली. सदर शिबिरासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या माध्यमातून उदंड असा प्रतिसाद दिला व आपले लसीकरण करून घेतले. विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्यानंतर घ्यावयाची वैद्यकीय स्वरूपाची काळजी याची अतिशय उत्तम व सक्षम स्वरूपाची तयारी शाळेकडून करण्यात आली.या शिबिरासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी वंदना पाटिल,शीतल बोरसे,सगुणा बारेला, प्रतिभा सावळे सिस्टर यांचे सुद्धा अतिशय उत्तमरीत्या उपरोक्त शिबिरासाठी सहकार्य लाभले. त्यांनी लसीकरणाचे फायदे व त्याचसोबत मनातील भीती काढून विद्यार्थ्यांना मानसिक स्वरूपात लसीकरणासाठी अनुकूल तयार करून त्याच्यासाठी आनंदमय वातावरण तयार केले. सदर शिबिरासाठी अनमोल सहकार्य मार्गदर्शन संस्थेच्या अध्यक्षा अड ललिता पाटिल, प्राचार्य विकास चौधरी,समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे लाभले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button