Amalner

अमळनेर: बडगुजर समाजाची बिनविरोध निवडणूक आणि नारीशक्ती सन्मान व सत्कार.

अमळनेर: बडगुजर समाजाची बिनविरोध निवडणूक आणि नारीशक्ती सन्मान व सत्कार.

अमळनेर बडगुजर मंगल कार्यालय येथे क्षत्रिय बडगुजर समाज मंडळ अमलनेर रजिस्ट्रेशन नंबर एफ.२७२५ जळगांव धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी कृत संस्थेचे दि.०१/०४/२०१८ पासून प्रलंबित असलेल्या निवडणूक साठी पात्र सभासदांची सभा संस्थेच्या घटनेप्रमाणे नियम क्र.६ ब, १२ आणि १६ प्रमाणे आधिन राहून शासकीय नियम, निर्देश व कायद्याच्या चौकटीत राहून घेण्यात आली असता १७इच्छुक सभासदांनी नावे देऊन उमेदवारी दर्शविली होती परंतु संस्था नोंदणीत जास्तीत जास्त १५ सदस्य असल्याने गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घ्यावी लागणार होती त्यासाठी पैसा व वेळ खर्च होणार होता म्हणूनआपसात चर्चा व समझोता होऊन संस्थेचे हित व उद्देश साध्य करण्यासाठी स्वेच्छेने २ उमेदवारांनी माघार घेतली आणि सर्वानुमते बहुमताने निवडणूकीत जगन्नाथ शेनपडूशेठ बडगुजर प्रा.एम एस.बडगुजर , प्रविण पुंडलिक बडगुजर, घनश्याम रमेश मांडळकर,रघुवीर भास्करराव गिरनार,दिनेश सुरेश मांडळकर,शुभम खेमचंद बडगुजर,यशवंत रामदास बडगुजर,प्रभाकर सुकदेव बडगुजर,विजय बन्सीलाल बडगुजर,किरण शांताराम बडगुजर,महारू गजमल बडगुजर,गणेश लोटनशेठ बडगुजर गिरीश प्रभुदास बडगुजर,दिलीप चांगदेव बडगुजर अश्या १५ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आणि त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच दुपारी ३ वाजता झालेल्या कार्यक्रमात समाजातील हालांकिच्या परिस्थितीशी जुळवून यशस्विपणे झुंज देत संसाराचा गाडा ओढण्यासाठी आधार देणारी समाजातील हिरकणी माताभगिनींना स्नेह भेट साडीचोळी सन्माननीय आमदार आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.सदर प्रसंगी माजी नगरसेवक दादा पवार, महेंद्र पाटील ( यश बिल्डर्स), डॉ.विशाल बडगुजर( बालरोगतज्ञ), नानासाहेब योगराज बडगुजर,भरत रघुनाथ बडगुजर, समाजातील जेष्ठ माधवराव बडगुजर, भाऊसो.सुकदेवशेठ बडगुजर आणि समाजाच्या माता भगिनींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button