Amalner

अमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..!

अमळनेर:अजून दोन तरुणी नेल्या पळऊन..!

अमळनेर गेल्या काही महिन्यात अमळनेर तालुक्यातुन अल्पवयीन मुली व तरुणी पळून जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.जवळपास40 ते 45 मुली आतापर्यंत गायब झाल्या आहेत.काही दिवसांपूर्वी दोन विभिन्न धर्मातील मुलगा व मुलगी पळून गेल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता.
आता पुन्हा तालुक्यातून दोन मुली पळवून नेण्यात आल्या आहेत.
याबबात सविस्तर माहिती अशी की, अमळनेर शहरातील रामेश्वरनगर मधील एक १९ वर्षीय तरुणी चाळीसगांव येथे सिव्हिल हॉस्पिटलला मुलाखत देऊन येते असे सांगून 30 नोव्हेंबर रोजी घरातून गेली पण परत आली नाही .तिच्या वडिलांच्या
फिर्यादीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे करीत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत दहिवद येथील एक ३३ वर्षीय तरुणी घरातील लोक शेतात गेले असताना घरातून निघून गेली. तिच्या वहिनीने दिलेल्या फिर्यादीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल कपिल पाटील करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button