Amalner

अमळनेर ते सोनगीर व अमळनेर ते तांदळी व्हाया 

अमळनेर ते सोनगीर व अमळनेर ते तांदळी व्हाया

शहापूर बस सेवा सुरू व्हावी या मागणीचे अमळनेर भाजपाच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन

सणासुदीत अमळनेर ते सोनगीर अमळनेर ते तांदळी वाया शहापूर बस सेवा बंद असल्याने तालुक्यातील त्या मार्गाच्या सर्व गावातील नागरिकांना अमळनेर येताना खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. खाजगी वाहने अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याने नागरिकांना त्या गोष्टीचा त्रास होऊ लागला. ही समस्या अमळनेर भाजप पदाधिकाऱ्यांनी हेरली. दि .२७ ऑक्टोबर ला अमळनेर आगार प्रमुख सौ भावे मॅडम यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, पंचायत समिती उपसभापती भिकेश पाटील ,भाजपा उपाध्यक्ष महेंद्र पाटील ,ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष दिलीप पाटील ,लोणबुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच कैलास पाटील ,मुडी येथील भाजपा शाखा प्रमुख हर्षल पाटील, भाजपा सरचिटणीस विलास सूर्यवंशी हे उपस्थित होते. निवेदन देते वेळी झालेल्या चर्चेत मुडीच्या पुढे एकविरा फाटा ते वालफाटा या दरम्यान पांजरा नदी जवळील पूल ,पुलावरील रस्ता खराब असल्याचे समजले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button