Amalner

Amalner: शहरात द बर्निंग कार चा थरार..!

Amalner: शहरात बर्निंग कार चा थरार..!अमळनेरात गॅसच्या भडक्यात संपुर्ण कार जळून खाकअमळनेर येथील बस स्टँड जवळ खासगी चारचाकी कारमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरत असतांना अचानक लागलेल्या आगीत चारचाकी वाहन संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना शहरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनेक वाहने ही बेकायदेशीर घरगुती गॅस वाहनात भरत असतात.अश्याच प्रकारे एका कारमध्ये गॅस भरत असताना अचानक आग लागल्याने पाहता पाहता कार जाळून खाक झाल्याची घटना आज अमळनेरात बस स्थानक परिसरात घडली. सुदैवाने कुठलाही अनर्थ घडला नाही.
शहरातील बसस्थानक परिसरात कार दुरुस्तीची गॅरेज असून याठिकाणी वाहनांमध्ये गॅस किट भरून त्यात गॅस भरत असतांना कारला दुपारी अचानक आग लागली . या आगीत गाडी जळून हजारो रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत पोलिसांत आगीची नोंद करण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button