Amalner

Amalner: चोऱ्यांचे सत्र थांबेना..!तुळजा भवानी च्या मूर्तीसह दागिने केले चोरांनी लंपास..!

Amalner: चोऱ्यांचे सत्र थांबेना..!तुळजा भवानी च्या मूर्तीसह दागिने केले चोरांनी लंपास..!

अमळनेर तालुक्यातील नगाव ह्या गावी चोरट्यांनी चक्क घरातून तुळजा भवानीच्या सोन्याच्या मूर्तीसह चांदीचे सिंहासन दीड लाखाचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना दि 15 जानेवारी रोजी भरदुपारी घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रवींद्र हेमंतगिर गोसावी यांच्या घरात तोंडापूर घराण्याची कुलदेवता तुळजा भवानीची 3 तोळ्याची सोन्याची मूर्ती, 40 ते 50 ग्राम चांदीचे सिंहासन, 40 ग्राम वजनाचा चांदीचा पाट यासह 1 लाख 55 हजार रुपयांच्या सोन्या चांदीच्या वस्तू दागिने दि 15 जानेवारी रोजी भर दुपारी 12.00 ते 2.30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. गोसावी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button