Amalner: चोऱ्यांचे सत्र थांबेना..दुकानातून हजारो रु ची चोरी..
अमळनेर येथील दुर्गा टी डेपो दुकानाचे शटर पट्ट्या तोडून चोरट्याने रोख रकमेसह सिगारेट पाकीटे 30 हजाराचा माल चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याबबात सविस्तर माहिती अशी की, संत सखाराम महाराज मार्केट मधील सुरेश
सतरामदास बठेजा यांचे दुर्गा टी डेपो आहे.या दुकानाच्या शटरच्या पट्ट्या तोडून दुकानातील 18 हजार रु चे सिगारेट पाकीट व 12 हजार रु रोख असा एकूण 30 हजार रु चा माल चोरून नेला आहे.सुरेश बठेजा यांनी फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हे कॉ शरीफ पठाण करत आहे.