Amalner

Amalner: तालुका हादरला..!अल्पवयीन मूक बधीर मुलीवर अत्याचार..!त्यातून गर्भधारणा राहिल्याने प्रकार उघडकीस..!

Amalner: तालुका हादरला..!अल्पवयीन मूक बधीर मुलीवर अत्याचार..!त्यातून गर्भधारणा राहिल्याने प्रकार उघडकीस..!

अमळनेर तालुक्यातील ढेकू ह्या गावी मूकबधिर अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार करून ती गरोदर राहिल्याची खळबळजनक घटना घडली आहे.यामुळे तालुक्यात खळबळ माजली असून तालुका चांगलाच हादरला आहे.या संदर्भात पोलीस ठाण्यात पोस्को व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की ढेकू बु येथील रहिवासी असलेले व सालदारकी करून उदरनिर्वाह करत असलेले मुलीचे पालक यांनी स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून मुलीची आई काही कारणास्तव तिच्या माहेरी राहत होती. पण गेल्या ती आठ दहा दिवसांपूर्वी ढेकू येथे राहायाला आली त्यावेळी तिच्या लक्षात आले की मुलीचे पोट मोठे दिसत आहे. ती गर्भवती असल्याची शंका आली. सदर मुलगी आधीपासूनच मूक बधीर आहे.या बाबत मुलीला विचारले असता तिने सांगितले की वडील व आजी शेतात कामाला जात होते तेव्हा गावातील दीपक भिल व लखन उर्फ अंकुश भिल ने शेतात नेण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केले. यावरून मुलीच्या वडिलांनी गावातील पोलीस पाटील व सरपंच याना सदर प्रकार सांगितला असता गावातील आणखी काही मुले 10 / 20 रुपये देऊन तिच्यावर अत्याचार करत असल्याचे समजले. पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button