Amalner

Amalner: चोऱ्यांचे सत्र थांबेना…! पहाटेच चोरांनी फोडले घर..!दोन लाखाहून अधिक माल चोरट्यांनी केला लंपास..!

Amalner: चोऱ्यांचे सत्र थांबेना…! पहाटेच चोरांनी फोडले घर..!दोन लाखाहून अधिक माल चोरट्यांनी केला लंपास..!

अमळनेर शहरातील प्रभाकरनगर मध्ये सकाळी अगदी पहाटेच्या सुमारास घरातून दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. घरातील महिला सकाळी मॉर्निंग वॉकला गेली असताना चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाचे दागिने लंपास केले असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबबात सविस्तर माहिती अशी की अमळनेर येथील वैशाली तुषार जोगी रा प्रभाकरनगर ही महिला दि 25 जाने तोजी पहाटे पाच वाजेला दोन्ही मुले घरात झोपलेली होती व पती नोकरीवर गेले असताना दोन महिलांसोबत सकाळी मॉर्निंग वॉक ला गेली असताना अज्ञात चोरट्यानी घरातील सामान इकडे तिकडे फेकून कपाट किल्लीने उघडून कपाटातील 62 हजार 19 रुपयांची 21 ग्राम सोन्याची माळ ,1 लाख 27 हजार 200 रुपयांचे 40 ग्राम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, 12 हजार
338 रुपयांचे सोन्याचे पेंडल, 12 हजार 500 रूपयांचा मोबाईल,1450 रुपये रोख असा एकूण 2 लाख 15 हजार 657 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सदर महिलेच्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरी क्षक गंभीर शिंदे करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button