Amalner

अमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…

अमळनेर : माईंड पार्लर मधील फलक, लोकांच्या चर्चेला उधाण…

अमळनेर येथे माईंड पार्लर सुरू करण्यात आले आहे. जसे आपण सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पार्लर मध्ये जातो.चेहरा आणि इतर बाह्य अवयव सुंदर दिसावेत यासाठी प्रयत्नशील असतो.पण मनाच्या सुंदरतेच काय..?हे कोणी विचारात घेत नाही. पण सामाजिक कार्यकर्त्या चळवळीतुन चळवळ घडविण्यासाठी प्रयत्न शील असणारी आमची मैत्रीण दर्शना ने मात्र हे ओळखले आणि माईंड पार्लर ची सुरुवात केली. येथे मनाची मशागत होते.मन सुंदर विचारी आणि क्रियाशील बनविण्याची प्रक्रिया येथे होते.पण ह्याच माईंड पार्लर च्या बाहेर एक फलक सध्या चर्चेचा विषय आहे…चला तर मग जाणून घेऊ या काय नेमका विषय…

आता तुम्ही आपसात चर्चा करण्यापेक्षा असे बोर्ड मला लिहण्याची गरज का जाणवली याचे उत्तर मला द्यायला आवडेल..असे दर्शना पवार यांनी सांगितले..

हे वाक्य लिहण्याचा प्रवास हा 2010 पासूनचा आहे. म्हणजे आम्ही सर्व महिलांच्या प्रश्नावर बोलायला लागलो स्री सन्मान म्हणजे नेमके काय हे सांगायला लागलो. या वाक्यनिर्मीतीचा प्रवास तेव्हापासूनचा आहे.

अनेक एकल महीला, माहेरी राहणाय्रा स्रियांना वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यातला महत्त्वाचा एक प्रश्न
1) – तूझा नवरा काय करतो.
2) – तूझे लग्न झाले का ❓
3) – सासर कूठले
4) – किती मुले आहेत.
5) – माहेर हे आहे मग, माहेरी का राहते.
6) – भांडण झाले तर मग कशामुळे झाले.
7) – कोणाची चूक होती.
8) – किती वर्षे राहीली.
9) – दुसरे लग्न का नाही केले. ……. वैगेरे म्हणजे प्रश्न संपत नाही….
त्या महिलेच्या उत्तर नूसार पुढील प्रश्न ठरलेले असतात.
प्रवासात कामाच्या ठिकाणी, चालता बोलता सर्व सुरूच राहते. अनेक मुली म्हणायच्या ताई बाहेर कामाला गेल्यावर असे प्रश्न लोक विचारतात. म्हणून बाहेर कामाला जाण्याची इच्छा होत नाही. भीती वाटते. त्या प्रश्नांची उत्तरे देताना देता जखमा पुन्हा पुन्हा कूरतडल्या जातात. मन पुन्हा पुन्हा भूतकाळातील वेदनांनी भरून जाते. जणूकाही अन्याय सहन न करता माहेरी येण्याचा निर्णय घेतला, सन्मानाने जगण्याचा निर्णय घेतला तो या समाजाला मान्यच नाही. आम्ही जी गोष्ट विसरून जाऊ ईच्छितो वाईट स्वप्ना सारखी ती रोज मिनीटाला समोर आणता.
( चांगले शिक्षण घेतलेले स्री/पुरूष देखील असे प्रश्न विचारतात. तिचा नवरा, आणि मग तो आहे का नाही. आहे तर जिवंत का मेला. जिवंत तर सोबत आहे. का एकटीच आहे. आणि एकटीच तर मग नेमके काय झाले असेल. अतिशय कोत्या मनाचे प्रश्न. त्यात ती स्री भित्री असेल. तिला परखड उत्तर देता येत नसेल तर तिला जास्तच छळतात. पण या प्रश्नानी ती स्री अपमानीत नाही होत तर समाज म्हणून आपण सारेच अपमानीत होतो. आपला विचित्र संकोचित चेहरा आरसा दाखवल्या सारखा समोर येऊन उभा राहतो. )

मी अनेक पुरूष मित्रांना हा प्रश्न विचारला तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात का ❓ तूला कुठे दिले , तूझी बायको काय करते. वैगेरे सर्वच…..
तर ते म्हणाले नाही ताई अगदीच परीचय किंवा जवळचे व्यक्ती सोडले तर असले प्रश्न आम्हाला अनोळखी व्यक्ती कडून विचारले जात नाही. आम्हाला आमची नोकरी शिक्षण आवडनिवड , एवढेच बोलले जाते.

समाजातील लोक जे या वाईट सवयीने बरबटलेले आहेत. किंवा त्यांनी त्यांच्या बौद्धिक क्षमता कुवती यापुढे जाऊन वाढवल्याच नाहीत. ते हळूहळू सूधरतील किंवा सुधारणार नाहीत.. हो पण तुम्ही तुमच्या मध्ये बदल घडवला तर त्यांना दुरुस्त व्हावे लागेल.
कोणी विचारले तर सांगा…
म्हणजे परिचयातील असतील तर एवढेच सांगा ..
(जोडीदार सोबत राहत नसाल तर)
जमत नाही सोबत नाही. ( चर्चा करत बसू नका म्हणजे मानसिक तणाव वाढणार नाही. )
100%अनोळखी असतील तर , ……
मला माझ्या व्यक्तिगत आयुष्य बद्दल बोलायला आवडत नाही. मला वाटते ज्या कामासाठी आले त्या कामाबद्दल च बोला. ….
आणि मी हे लिहून केलेला एक प्रयत्न

शांत पणे न रागवता न चिडता लोकांच्या सवयी बदला.
लोक बदलता यावर माझा विश्वास आहे. तूम्ही पण विश्वास ठेवा. याबद्दल तुमच्या अधिक अडचणी असतील तर या माईंड पार्लर मध्ये तुमचे स्वागत आहे.
बाकी सर्व स्तरातून कौतुक झाले त्याबद्दल आभार
शेवटी तुम्ही कौतुक करता म्हणजे तुमची पण ती भूमिका होतीच फक्त व्यक्त करता आली नाही. तुमच्या सारखे पाठीराखे आहेत. हेच माझे बळ आहे.
उद्देश – विवाहित /अविवाहित/ एकल महीला/ विधवा…. कोणत्याही महीलांना असे प्रश्न विचारले जाऊ नये. तुमची क्षमता आहे तिचा प्रश्न समजून घ्यायची हे लक्षात आले. विश्वास वाटला. तर ती ठरवेल तुमच्या सोबत व्यक्तिगत विषयावर बोलायचे का नाही. तोपर्यंत चर्चा नाही…

दर्शना पवार – 9075570510 , 8857902853

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button