Amalner

Amalner: दर्शनाला गेलेल्या महिलेचा मोबाइल चोरट्याने केला लंपास

Amalner: दर्शनाला गेलेल्या महिलेचा मोबाइल चोरट्याने केला लंपास

अमळनेर येथील गांधली रस्त्यावरील सप्तश्रृंगी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचा मोबाईल चोरून नेल्याची घटना दिनांक ४ रोजी घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की भडगाव येथील रहिवासी दुर्गाबाई जिजाबराव पवार या त्यांच्या पतीबरोबर कार्यक्रमाला गांधली रस्त्यावरील सप्तशृंगी मंदिरात आले होते.देवीचे दर्शन घेतल्यानंतर चोरट्याने त्यांना त्याच्या पर्समध्ये ठेवलेला मोबाईल आढळून आला नाही. त्यावेळी मोबाईल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हे.कॉ. सुनील पाटील करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button