Amalner

अमळनेर: मतदार यादीत नाव नोंदविण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर तर यासाठी ही कागदपत्रे आवश्यक..!

अमळनेर: मतदार यादीत नाव नोंदविण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर तर यासाठी ही कागदपत्रे आवश्यक..!मा.भारतीय निवडणूक आयोगाचा दिनांक-०१/०१/२०२२ च्या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्र सह मतदार यादीचा विशेष सक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू असून त्या नुसार या द्वारे जाहीर आवाहान करण्यात येते कि,१५ अमळनेर विधानसभा मतदार संघात आज दिनांक २४/११/२०२१ रोजी संबधित प्रभाग निहाय परिसरामध्ये सभा घेऊन मोठया प्रमाणात मतदार यादीतील मतदान यादीचे वाचन केले तथा संबधित प्रभाग मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी नवीन मतदार नोंदणी, स्थलांतर मतदार,नावात दुरूस्ती, वगळणे , स्थलांतरीत मतदार, आणि अति महत्वाच्या व्यक्तीचे नाव चिन्हांकित करून प्रभाग निहाय नागरिकासमोर मतदार यादींचे वाचन केले.
सदरच्या कार्यक्रमास वार्ड निहाय अमळनेर नगर परिषदे मधील अधिकारी यांनी पथक प्रमुख म्हणून कामाचे नियोजन केले होते.
तथापी सदारचा सक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अहर्ता नुसार दिनांक-०१/०१/२०२२ रोजी १८ वर्ष पूर्ण होत असलेल्या मतदारांनी आपले नाव मतदार यादीत दिनांक-३०/११/२०२१ पर्यन्त नोंदवावे. असे आवाहान म.सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा मुख्याधिकारी नगर परिषद अमळनेर यांनी केले
आहे.अनळनेर विधानसभा मतदार संघातील दिनांक-०१/०१/२०२२ रोजी 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या मतदारांनी,आपले नाव मतदार यादीत दि.30/11/2021 पर्यंत नोंदविणे करिता खालील प्रकारचे कागदपत्रे फॉर्म सोबत जोडून सदर फॉर्म आपल्या यादी भागाचे BLO अथवा तहसील कार्यालय अमळनेर (निवडणूक
शाखा) येथे जमा करावेत.
नमुना नं. 6 नवीन नाव नोंदणीनिवासी पुरावा (कोणताही एक)जन्माचा दाखला
भारतीय पासपोर्ट
वाहन चालक परवाना
बैंक/किसान/पोस्ट पासबुक
रेशन कार्ड (शिधावाटप पत्रिका)
प्राप्तीकर निर्देश पत्रिका
भाडे करार पत्रपाणी / टेलीफोन वीज / गॅसचे बीलभारतीय टपाल खात्याच्या माध्यमातुन पाठवल गेलेल तुम्हाल पोस्ट किंवा पत्र.वयाचा पुरावा (कोणताही एक)भारतीय पासपोर्ट
वाहन चालक परवाना/ड्रायव्हींग लायसन्स
आयकर ओळखपत्र/पॅनकार्ड
शाळा सोडल्याचा दाखला
इ.10 वी , 8 वी, 5 वी ची गुणपत्रीकाछायाचित्र – 01
नमुना नं 7 – स्थलांतरीत, मयत, दुबार यांचे नाव मतदार यादीत कमी करण्यासाठी
नमुना नं 8 नावात, जन्मतारीख, पत्ता व इतर दुरुस्ती करणेकामी.
नमुना नं 8 अ एकाच मतदारसंघात नाव स्थलांतरीत करण्यासाठीअसे म.सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा
मुख्याधिकारी नगर परिषद अमळनेर यांनी कळविले आहे.अमळनेर: मतदार यादीत नाव नोंदविण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर तर यासाठी ही कागदपत्रे आवश्यक..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button