Amalner

Amalner: संत गाडगेबाबांच्या अनुयानांनी शहरातील स्मारक केले चकचकीत

Amalner: संत गाडगेबाबांच्या अनुयानांनी शहरातील स्मारक केले चकचकीत

जयंतीदिनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली,लोकप्रतिनिधींचाही सहभाग

अमळनेर-राष्ट्रसंत गाडगेबाबा म्हणजे स्वच्छतेचे पुजारी त्यांच्या जयंतीदिनी अमळनेर शहरातील बाबांच्या अनुयायांनी शहरातील बहुसंख्य स्मारकावर स्वच्छता अभियान राबवून वेगळ्या पद्धतीने बाबांना आदरांजली अर्पण केली.
युवा परिट समाज मंडळाने आयोजित केलेल्या या अभियानात लोकप्रतिनिधी आणि आणि युवा परिट समाज मंडळाचे पदाधिकारी व समाज बांधवांनी उत्साहाने सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी केले.सुरवातीला पाच पावली देवी चौकातील संत गाडगेबाबा चौकातील स्मारक स्थळी स्वच्छता अभियान राबवून माजी आ.स्मिताताई वाघ यांच्या हस्ते बाबांच्या प्रतिमेचे पूजन आणि बाबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

त्यानंतर संत गाडगेबाबा उद्यानातील प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण झाले त्यानंतर धुळे रस्त्यावरील बस स्टॅण्ड वरील अहिल्याबाई होळकर स्मारक,महाराणा प्रताप चौकातील महाराणा प्रताप यांचे स्मारक,कचेरी समोरील बळीराजा स्मारक आणि जिजाऊ प्रवेशद्वार त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक,नाटय.गुहमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात अर्बन बँके समोरील पूज्य सानेगुरुजी पुतळा,सुभाष चौकातील सुभाष बाबूजी पुतळा व शेवटी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याचा परिसर स्वच्छ व चकचकीत करण्यात आला.या अभियानात सर्व राजकीय व सामाजिक पदाधिकारी व समाज बांधवांनी स्वतः हातात झाडू घेऊन सक्रिय सहभाग नोंदविला,विशेष म्हणजे झाडू मारल्यानंतर सर्व स्मारकावर पूजन व माल्यार्पण तसेच सर्व स्मारकाच्या परिसरात सुशोभित रांगोळी देखील काढण्यात आल्या.

सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत हे अभियान सुरू होते,सदर सामाजिक अभियानाचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले.
रवींद्र जाधव उमेश वाल्हे गंगाराम वाल्हे गिरीश चित्ते अनिल वाघ गणेश नेरकर अविनाश जाधव मनोज निकुंभ विजय वाघ मधुकर निंबाळकर भरत जाधव अनिल वाल्हे विनोद जाधव अनिल जाधव मोतीलाल जाधव दिपक सुर्यवंशी तर दिपक वाल्हे यांनी सुशोभित रांगोळ्या काढल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button