Amalner

Amalner: त्या दुभाजकाने घेतले 42 बळी..!

Amalner: त्या दुभाजकाने घेतले 42 बळी..!

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील माध्यमिक विद्यालयाजवळ चारचाकी दुभाजकावर आढळून तब्बल ४२ वा अपघात झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अपघाताचे अर्ध शतक होण्याची वाट पाहत आहेत का असा सवाल करत शिवजयंतीला सकाळी रस्ता रोको आंदोलन छेडले. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रबलिंग स्ट्रिप्स व इतर सुविधा करून देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

हायब्रीड ऍन्यूटी अंतर्गत करण्यात आलेल्या फागणे ते चोपडा या रस्त्याचे काम अमळनेर विभाग अंतर्गत असतांना देखील धुळे सा बा विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत हात उंच करून आमचा संबंध नाही असे सांगते. अनेक चुका आणि अपूर्णता तसेच दुभाजकजवळ सामान्य नागरिकलाही कळेल असा तांत्रिक दोष असल्याने याठिकाणी तब्बल ४२ वाहने दुभाजकावर आदळून अपघात झाले. १८ रोजी रात्री एम एच ०३ ,डी के ७९० ही चारचाकी आदळून दोन्ही एअर बॅग देखील फुटल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी एक ट्रक दुभाजकावर चढून उलटला होता. चार दिवसांपूर्वी एक रुग्णवाहिका दुभाजकावर चढून ५० ते ७० मीटर दुभाजकावर चालून सरळ उतरून गेली सुदैवाने वाहन उलटले नाही. यामुळे मंगरूळ येथील श्रीकांत पाटील ,राकेश पाटील , अनंत निकम , ग्राप सदस्य बापू पाटील , भटू घोलप , नाना खंडू पाटील यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी रस्ता रोको केल्याने काही वेळ वाहतूक खोळंम्बली.
आंदोलन सुरू होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील , माजी आमदार शिरीष चौधरी, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे , हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे , हेडकॉन्स्टेबल संजय पाटील , मिलिंद भामरे , सिद्धांत शिसोदे , हितेश चिंचोरे ,पोलीस पाटील भागवत पाटील यांनी भेट दिली.
प्रांजल पाटील यांनी जरी हा रस्ता आमच्या खात्याच्या अखत्यारीत दिलेला नसला तरी ताबडतोब काही अंतरावर रबलिंग स्ट्रिप्स , पांढरे पट्टे टाकून देतो आणि आवश्यक ती फलक ,चिन्हे व दुरुस्ती करून देतो. असे आश्वासन दिले. आणि धुळे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ठेकेदार रावसाहेब भदाणे यांना कळवण्यात आले.
ग्रामविकास अधिकारी संजीव सैंदाने यांनी यांनी मंगरूळ हद्द प्रारंभ पासून रस्ता चार पदरी करण्यात यावा , कॅट आईज ,झेब्रा क्रॉसिंग पट्टे , वळण बोर्ड , सूचना फलक , स्पीड ब्रेकर्स , पथदिवे लावण्यात यावेत आणि पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायत करेल असे पत्र सा. बां. ला दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button