Amalner

अमळनेर तालुका ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करावी..भारतीय जनता पार्टीचे निवेदन

अमळनेर तालुका ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करावी..भारतीय जनता पार्टीचे निवेदन

गेल्या महिन्याभरापासून अमळनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे उरल्या सुरल्या खरिप पिकांचे चिखल झाले आहे . झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळयातून अधुंचा पुर वाहु लागला आहे . अश्या संकटाच्या काळात बळी राजाला धिर देणे अत्यंत गरजेचे आहे . म्हणून अमळनेर तालुक्यात सर्वच पिकांचे १०० % नुकसान झाले असून पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा फार्स न करता पिकपेरा निहाय सरसकट मदत जाहिर करण्याचे आदेश दयावे . पावसामुळे मोठया प्रमाणात शेती पिकांची हानी झाली आहे . हजारो हेक्टर जमीनी पुरात खरडुन गेल्या . बहुतांश गांवानां शेतात पाणी तुडूंब भरुन हाता तोंडाशी आलेले कपाशी , ऊस , मका , ज्वारी , बाजरी , आदी सर्व पिके खराब झाली आहेत . अधिच मुंग , उडीद , सोयाबीन हातातुन गेलेली आहे . कापसावर लाल्या व बोंड काळी पडली आहेत . तसेच फुटलेल्या कपाशीला कोंब आले आहेत . त्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणात सापडलेला आहे . यामुळे शेतकरी पुर्णपणे आर्थिक संकटात सापडलेला आहे . त्याला शासकिय मदती शिवाय आधार दिसत नाही . तरी महोदयांना विनंती की , सदर अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ शासनाकडून मदत मिळावी व जाहिर केलेला २५ % पिकविमा न देता १०० % पिकविमा जाहिर करुन सदर रक्कम शेतकन्यांना त्वरीत देण्यात यावी . या करीता आपल्या स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी . तात्काळ मदत जाहिर न झाल्यास दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकरीता अमळनेर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरुन तिव्र स्वरुपात अंदोलन करेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button