Amalner

Amalner: मनसेच्या मागणीला यश..!अतिवृष्टी ची नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांना मिळणार…!शासन निर्णय जारी..!

Amalner: मनसेच्या मागणीला यश..!अतिवृष्टी ची नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांना मिळणार…!

अमळनेर मनसे चे मागणीला यश मिळाले आहे.अमळनेर मनसे सदैव शेतकरी राजा यांच्या पाठीशी आहे जिथे पण शेतकऱ्यांवर अन्याय होईल तिथं मनसे आपल्याला अगोदर दिसेल.
शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी आला. लवकरच अतिवृष्टीमुळे झा तीलेल्या नुकसानीपोटीचा उर्वरित हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.मा. तहसीलदार साहेब यांना अमळनेर तालुक्यातील काही गावात शहापूर कळमसरे वासरे मारवाड डांगरी इत्यादी गावात वादळी वारा तसेच अतिवृष्टीमुळे 22.1.2022 रोजी या शिवारात शेती पिक मका हरभरा गहू दादर इत्यादी पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी आज पावत कोणताही शासकीय पंचनामा झालेला नाही झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे तरी शेतकरी यांना दिलासा म्हणून आपण आपल्या स्तरावर पंखा पंचनामे करून शासन दरबारी पाठपुरावा करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळवून द्यावी याबद्दल आपण निवेदन देण्यात आले होते सरकार आपले निवेदन चे दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देत आहे यासंदर्भात शासन निर्णय नुकताच म्हणजे दिनांक 16 फेब्रुवारी 2022 ला रोजी काढण्यात आलेला आहे.

ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीमधील निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७५ टक्के निधी वितरीत करण्यात आलेला आहे
आता उर्वरित जो निधी आहे तो विविध जिल्ह्यांना वितरीत करण्यात आलेला आहे
या संदर्भातील शासन निर्णय नुकताच म्हणजेच दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ रोजी काढण्यात आलेला आहे. ह्या शासन निर्णयाची लिंक या लेखाच्या खाली दिलेली आहे तुम्ही तो शासन निर्णय म्हणजेच जी आर बघू शकता.अशी माहिती संदीप पाटील (काटे) तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमळनेर व इतर मनसे कार्यकर्त्यांनी दिली आहे.शासन निर्णय क्र आहे त्यावरून तो आपण नेटवर मिळवू शकतात.

या संदर्भात ठोस प्रहार ने सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे. सतत अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या वृतांतातून ठळकपणे मांडल्या आहेत.

Amalner: मनसेच्या मागणीला यश..!अतिवृष्टी ची नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांना मिळणार...!शासन निर्णय जारी..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button