Amalner

Amalner:पोलीस उपअधिक्षक राकेश जाधव यांची धडक मोहीम..!तीन सट्टा जुगार अड्ड्यांवर धाडी..!मुद्देमालासह आरोपी ताब्यात..!

Amalner:पोलीस उपनिरीक्षक राकेश जाधव यांची धडक मोहीम..!तीन सट्टा जुगार अड्ड्यांवर धाडी..!मुद्देमालासह आरोपी ताब्यात..!

अमळनेर येथे सातत्याने अवैध मार्गाने सट्टा व जुगार सुरू असतो या संदर्भात विविध तक्रारी प्राप्त झाल्यामुळे पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव यांनी शहरात सुरू असलेल्या मटका, सट्टा, जुगाऱ्यांवर आपली कार्यवाही दाखवत पथके तयार करून धाडी टाकल्या असून मुद्देमालासह तीन लोकांना ताब्यात घेतले आहे.यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतीत सविस्तर माहिती की, अमळनेर शहरात अनेक ठिकाणी हिरवे पडदे लावून राजरोसपणे अवैध धंदे चालू असल्याच्या नागरिकांनी तोंडी तक्रारी पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांच्या कडे केल्या होत्या.या संदर्भात लवकरच कार्यवाही करू असे राकेश जाधव यांनी नागरिकांना आश्वासन दिले होते.

या संदर्भात सूत्रांकडून माहिती गोळा करून राकेश जाधव यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तीन पथके बनविले. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील झामी चौकात कसली मोहल्ला रस्त्यालगत विठ्ठल सनासे हा अवैध मटका जुगार चालवत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने तेथे धाड टाकून एकूण रक्कम 7940 रु व इतर साहित्य ताब्यात घेतले.

दुसऱ्या कार्यवाहीत सपोनि राकेशसिंग परदेशी यांनी पोउपनी नरसिंह वाघ यांच्यासह पोलिस कर्मचारीनीं दगडी दरवाज्याजवळ रमेश अहिरे हा कल्याण मटका सट्टा ,जुगार अड्डा चालवत असल्याचे आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन एकूण रोख रक्कम 710 रु व साहित्य जप्त केले.

तर तिसऱ्या कार्यवाहीत शहरातील झामी चौकातील टपरीच्या आडोश्याला अरमान फकीर हा बेकायदेशीर मटका जुगार चालवत असल्याने पोउपनी गंभीर शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत अचानक धाड टाकून अरमान फकीर सह रोख रक्कम 530 रु सह जुगार साहित्य ताब्यात घेतले आहे.

वरील तिन्ही आरोपींवर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकात पोहेकॉ मेघराज महाजन, पो. कॉ. गणेश पाटील, संजय बोरसे, पोना योगेश महाजन, पोकॉ गणेश पाटील इ चा समावेश होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button