Amalner: संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यासंदर्भात निवेदन
जळगांव जिल्ह्यातील सर्व कार्यालयात १५ फेब्रुवारी २०२२ रोजी संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्या संदर्भात श्री किरण लालसिंग जाधव ढेकू बु!तांडा ता अमळनेर जि जळगांव अध्यक्षः- श्री संत सेवालाल उत्सव समिती अमळनेर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांना अर्ज केला आहे.
वरील विषयास अनुसरुन १५ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व कार्यालयात संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्याबाबतचे पत्रक आपण काढून कार्यालय प्रमुखाना अवगत करावे , आमच्या असे निर्दशनास आलेले आहे की कुठल्याही कार्यालयात श्री संत सेवालाल महाराज जयंती साजरी केली जात नाही, (मी २०१८ वर्षी माहितीच्या अधिकारात अमळनेर तालुक्यात माहिती मागविली होती)
वास्तविक महाराष्ट्र शासनाचे राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व पुण्यतिथी साजरा करण्याबाबत शासणनिर्णय सामान्य प्रशासन विभाग जपुती २२०८/१३३८ / प्र.अ.१०९/०८/२९ दि २४/११/२००८ तसेच दि १५ फेब्रुवारी २०२२ महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने राज्यातील सर्व कार्यालयात
श्री संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्याबाबतचे आदेशित केलेले असतांना देखील ,जाणून बुजून गोर बंजारा समाजाला दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यामुळे आपण जिल्ह्यातील सर्वच कार्यालयात स्मरण पत्रक काढावे ही आग्रहाची नम्र विनंती.