Amalner

Amalner: धरणगाव येथील लहान बालिकांवर अत्याचार प्रकरणी अमळनेर तेली पंच मंडळाकडून निषेध व्यक्त करत निवेदन

Amalner: धरणगाव येथील लहान बालिकांवर अत्याचार प्रकरणी अमळनेर तेली पंच मंडळाकडून निषेध व्यक्त करत निवेदन

अमळनेर धरणगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीचा निषेध व्यक्त करत सदर आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.अश्या स्वरूपाचे निवेदन अमळनेर तेली मंच ने उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.

ह्या निवेदनात सदरची घटना निंदनीय असून सदर आरोपीस इतकी कठोर शिक्षा द्यावी की यापुढे कोणी असे कृत्य करण्यास धजावणार नाही. ही मागणी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यापर्यंत पोहचावावी असे निवेदनात नमूद केले आहे.

सदर निवेदनावर तेली पंच मंडळ अध्यक्ष संजय चौधरी, उपाध्यक्ष सुरेश चौधरी, अरुण चौधरी, पराग चौधरी, सुरेश चौधरी, शांताराम चौधरी इ च्या सह्या असून निवेदन देतेवेळी मोठ्या प्रमाणावर समाज बंधू भगिनी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button