Amalner: सचिनभाऊ खंडारे मित्रपरिवार तर्फे प्र 13 मध्ये शिवजयंती साजरी..
अमळनेर वार्ड क्रमांक 13 मध्ये सचिन खंडारे व सचिनभाऊ मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक उपक्रम राबवले जातात. आज शिवजयंती उत्सव गजानन महाराज मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आला.
वार्ड क्रं 13 मध्ये सचिन मधुकर खंडारे व सचिन भाऊ मित्र परिवार तर्फे आयोजीत शिवजन्मोत्सव श्री गजानन महाराज मंदिर येथे सालाबादप्रमाणे या ही वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती महाराज यांचा प्रतिमीचे पूजन जेष्ठ नागरिकाचा हस्ते करण्यात आले.याप्रसंगी परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.