Amalner

Amalner: नॅशनल युथ स्पोर्ट्स चॅपियनशीप साठी कबड्डी स्पर्धेत प्रतापच्या दिनेश बारेलाची निवड..!

Amalner: नॅशनल युथ स्पोर्ट्स चॅपियनशीप साठी कबड्डी स्पर्धेत प्रतापच्या दिनेश बारेलाची निवड..!

अमळनेर नॅशनल युथ स्पोर्टस् अॅण्ड एज्युकेशन गेम चेमपीयनशीप इंडिया तर्फे गोवा येथे 27 ते 31 जानेवारी दरम्यान कब्बडी स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रताप कॉलेज मधील T.Y.B com चा विद्यार्थी-खेळाडू दिनेश बारेलाची निवड झाली आहे.

दिनेश या आधी शेगाव येथे झालेल्या चाचणीत यशस्वी ठरला होता. या निवडी बद्दल कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. आर. शिरोडे, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष प्रमुख डॉ. जयेश गुजराथी, उप प्राचार्य डॉ. एम. एस. वाघ, डॉ. जे. बी. पटवर्धन, डॉ. निकुंभ, डॉ. कल्पना पाटील, सल्लागार प्रा.पटाग पाटील, सीनियर जिमखाना
प्रमुख डॉ. विजय तुंटे, क्रीडा संचालक सचिन पाटील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button