Amalner

Amalner: थकबाकी वसुलीची न प ची धडक मोहीम..! 7 दुकानांना सील..!

Amalner: थकबाकी वसुलीची न प ची धडक मोहीम..! 7 दुकानांना सील..!

अमळनेर नगरपरिषदने मालमत्ता कर थकबाकी वसुलीची धडक मोहीम सुरू
केली असून सात दुकानासह गोदाम सील केल्याची कारवाई केली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मार्च जवळ येऊनही कोट्यावधी रूपयांची थकबाकी वसुल न झाल्याने अमळनेर नगर परिषदेने ने कारवाईची कठोर पावले उचलली आहेत.

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या आदेशाने थकबाकीदार दुकानदारांवर वसुलीची
धडक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.यात पै.हाामजी प्रेमजी व्यापाटी संकुल, ट्रक टर्मिनल व्यापारी संकुल,कै.राजीव गांधी मार्केट जुना स्टैंड, युरीफ शॉपींग सेंटर,कै.लालबहादुर व्यापारी संकुलातील सात थकबाकीदार दुकानांना सिल
लावण्यात आले आहे. उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, सहा. मिळकत व्यवस्थापक संजय चौधरी, वसुली विभाग महेश जोशी, राजेंद्र वानखेडे व मनोज सोनार यांच्या पथकाने पु.साने गुरुजी व्यापारी संकुलातील दुकान नं. दु.नं.42, दु.नं.43 सील केले. तसेच महात्मा गांधी व्यापारी संकुलातील दु.नं.11, दु.नं.10 व दु.नं.20 या दुकानांना सील केले आहे तर सुजाण मंगल कार्यालयाला सहा लाख थकबाकी असल्याची नोटीस चिकटवली आहे.याच बरोबर व्यापारी आणि नागरिकांनी वेळेवर कर भरावा असे आवाहन देखील अमळनेर न प ने केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button