Amalner

Amalner: शालकाने मेव्हण्याच्या डोक्यात पत्नी नांदत नसल्याच्या वादातून टाकला रॉड..!

Amalner: शालकाने मेव्हण्याच्या डोक्यात पत्नी नांदत नसल्याच्या वादातून टाकला रॉड..!

अमळनेर येथील मांडळ येथे बायको नांदायला येत नाही या वादातून शालकाने मेव्हण्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारत भावासही मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मुकेश रघुनाथ कोळी रा मांडळ यांची पत्नी नांदायला येत नसल्याने दोन्ही कुटुंबात दोन वर्षांपासून वाद सुरू होते. दि १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मोठा भाऊ राकेश रघुनाथ कोळी घराबाहेर असतांना मुकेश याला भांडणाचा आवाज आल्यामुळे सासरे रामचंद्र आनंदा शिरसाठ,शालक राज रामचंद्र शिरसाठ , सासू सुरेखाबाई रामचंद्र शिरसाठ , जिजाबाई यशवंत शिरसाठ, हे चौघे जण राकेशला मारहाण करीत होते. म्हणून मुकेश भांडण सोडवायला गेला असता राजने हातातील लोखंडी रॉड मुकेशच्या डोक्यावर ,पाठीवर ,हातावर व पायावर मारून गंभीर दुखापत केली तर सासरे रामचंद्र याने काठीने मारहाण केली तसेच दोघा महिलांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तर राज याने राकेशच्या पायावर लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. आजूबाजूच्या लोकांनी भांडण सोडल्यानंतर दोघा भावाना उपचारसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button