Amalner

Amalner: देवगांव देवळी हायस्कूलमध्ये संत गाडगेबाबा जयंती साजरी

Amalner: देवगांव देवळी हायस्कूलमध्ये संत गाडगेबाबा जयंती साजरी

अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे संत गाडगेबाबा यांची जयंती निमित्ताने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. यावेळी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, समाज सुधारक होते ,त्यांनी सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात त्यांना जास्त रुची होती. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे हा त्यांचा संदेश विद्यार्थ्यांना यावेळी सांगण्यात आला .संत गाडगेबाबा माणसात देव शोधणारे संत होते हे विद्यार्थ्यांना यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के, आय.आर.महाजन,एस.के.
महाजन,एच.ओ.माळी,शिक्षकेत्तर कर्मचारी एन.जी.देशमुख, संभाजी पाटील, गुरूदास पाटील यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button