Amalner

Amalner: सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांच्या  कर्तृत्वाचा महासन्मान

Amalner: सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांच्या कर्तृत्वाचा महासन्मान

सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांच्या सत्कारासाठी कर्तृत्वाचा महासन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ एस आर चौधरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगांव येथील अतिरिक्त आयकर आयुक्त विशाल मकवाने जळगांव मनपाचे वित्त व लेखाधिकारी श्री कपिल पवार अमरावतीचे दिलीपराव जिचकार नुकतेच यूपीएससी उत्तीर्ण चेतन जिचकार सानेगुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे सौ शारदा जिचकार अमरावती व डॉ सायली जिचकार अमरावती व्यासपीठावर उपस्थित होते
याप्रसंगी यूपीएससी उत्तीर्ण चेतन जिचकार अमरावती यांचा भव्य सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला चेतन जिचकार हे शिरसाळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस आर बोरसे यांचे जावाई आहेत तसेच एमबीबीएस परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी पास झाल्याबद्दल अभिषेक बोरसे आरोग्य सेवक पदी निवड झालेले रवींद्र जाधव मुंबई मेट्रोत निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वर पाटील मुंबई पोलीस पदी निवड झालेले जयवंत पाटील व राकेश पवार इंडियन नेव्हीत निवड झाल्याबद्दल सुमित पवार यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगांव चे अतिरिक्त आयकर आयुक्त विशाल मकवाने म्हणाले की
पद पैसा शाश्वत नसून माणुसकी महत्वाची आहे पू. सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे आयोजित कर्तृत्वाचा महासन्मान या कार्यक्रमात ते बोलत होते.
योग्य मार्गदर्शन व कष्ट करण्याची तयारी असली की यूपीएससीत यश मिळविता येते मी स्वतः इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले एका नामांकित कंपनीत नोकरी करीत असताना यूपीएससीची तयारी केली व यशस्वी झालो विद्यार्थ्यांना याप्रसंगी त्यांनी काही महत्वाच्या टिप्स दिल्या तसेच यूपीएससी च्या पूर्व मुख्य परिक्षा आणि मुलाखतीच्या तयारी साठी मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे श्री कपिल पवार यांनी पू. सानेगुरुजी ग्रंथालय अमळनेर तर्फे सुरू करण्यात आलेली मोफत स्पर्धा परीक्षा चळवळ यशस्वीपणे सुरु आहे अनेक उच्च पदस्थ अधिकारी वेळोवेळी या केंद्राला भेट देतात व मार्गदर्शन करतात त्यामुळे केंद्रातुन अनेक अधिकारी निर्माण होत आहेत.अध्यक्षीय भाषणात डॉ एस आर चौधरी यांनी स्वतःचा जीवन प्रवास सांगितला सगळ्यांनी त्यातुन प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन केले. याप्रसंगी दिलीपराव जिचकार व जयवंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी निवृत्त नगरपालिका प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख आरटीओ स्वप्नील वानखेडे जळगांव पोलीस चंदन पाटील तालाठी मधुकर पाटील तलाठी महेंद्र पाटील प्रा.अनिल गरुड सौ कल्पना गरुड प्रतिभा बोरसे राम बोरसे लीलाताई बोरसे जिजाबराव नेरपगारे सोमनाथ चौधरी शशिकांत पवार हनुमंत पाटील सुवर्णा पवार,विलास साळुंखे कमलाकर संदानशीव कांतीलाल चौधरी व आर्मी ग्रुपचे सर्व सदस्य तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन विजयसिंग पवार यांनी केले आभार मुख्याध्यापक संजय राम बोरसे यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button