Amalner

Amalner: ऍड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा..

Amalner: ऍड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा..

अमळनेर अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेच्या अध्यक्ष अँड ललिता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच सचिव प्रा शाम पाटील संचालक पराग पाटील, देवश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी, प्राचार्य प्रकाश महाजन व क्रीडा शिक्षक केदार देशमुख व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी संपूर्ण देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना या कार्यक्रमास मुकावे लागले परंतु संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्हिडिओ लाईव्ह कॉन्फरन्सच्या सहाय्याने सर्व विद्यार्थ्यांना लिंक पाठवून कार्यक्रमात सहभागी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्कूल युनिफॉर्म मध्ये वेळेवर तयार राहून या कार्यक्रमात उत्साहात सहभाग नोंदविला व स्कूलच्या फेसबुक अकाउंट वरून देखील लाईव्ह प्रक्षेपण सुरू होते. सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी भारत माता की जय वंदे मातरम घोषणा देत ऑनलाइन पद्धतीने देशभक्ती चा अनोखा संदेश दिला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ॲड ललिता पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत सध्याच्या परिस्थितीत मनामध्ये सकाळ आत्मक सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. रुचिता पाटील मॅडम यांनी देशभक्तीपर गीत सादर केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button