Amalner

Amalner:चोर सोडून संन्याशाला शिक्षा…अवैध धंदे करणारे करत आहे रोखणाऱ्यावर गुन्हे दाखल..!साने नगर परिसरातील नागरिकांचे अधिकाऱ्यांना निवेदन…

Amalner:चोर सोडून संन्याशाला शिक्षा…अवैध धंदे करणारे करत आहे रोखणाऱ्यावर गुन्हे दाखल..!साने नगर परिसरातील नागरिकांचे अधिकाऱ्यांना निवेदन…

अमळनेर येथील सानेनगर भागातील अवैध चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या मार्फत वाळू चोरी रोखणान्यांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्याबाबत चे निवेदन नागरिकांनी आज अधिकाऱ्यांना दिले आहे.
सानेनगर,अमळनेर रहिवाशी आपणांस विनंती अर्ज करीतो की, काही वांपूर्वी
आमच्या सानेनगर भागातील बोरी नदी पात्रात मोठया प्रमाणात झाडे-झुडपे, काटेरी झाडे हे मोठया प्रमाणात वाढलेली होती. त्यामुळे नदीच्या त्यापलीकडे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठया कष्टाने त्या झाडा झुडपांमधून वाट काढत जावे लागत होते. नदीची अवस्था खूपच खराब होती. परंतू आम्ही ग्रामस्थ व माजी आमदार श्री. साहेबराव पाटील, तसेच नगरपरिषद, अमळनेर यांच्या सहकार्याने नदीची साफसफाई करीत नदी पुर्नवस्थेत आणली. आमच्या सानेनगर भागातून मोठया प्रमाणात अवैध वाळू चोरी होत असते. आमच्या समस्त ग्रामस्थांचा सानेनगर भागातील बोरी नदी पात्रातील वाळू चोरीस विरोध असतो. परंतू वाळू चोरी
करणारे व्यक्ती हे दांडपणा करतात त्यामुळे त्यांना वाळू चोरी करण्यापासून रोखणे शक्य होत नाही.

आमच्या भागातील रहिवाशी प्रविण सरदार साळुके हे नेहमी वाळू चोरी रोखण्यासाठी सतत झटत असतात. त्यामुळे वाळू चोरी करणाऱ्या कडून त्यांचे विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये खोटया तक्रारी देवून त्यांना फसविण्यात आले आहे व वेगवेगळया न्युज पेपर मध्ये त्यांचे विरोधात खोटी माहिती पसरविण्यात येत आहे. आमच्या समस्त सानेनगर ग्रामस्थांचा वाळू चोरीस विरोध असतांना वाळू चोरी करणारे व्यक्ती दांडपणा करतात व प्रविण साळुके हे गांवाचा हितार्थ सानेनगर
भागातून वाळू चोरी होवू नये यासाठी सदैव प्रयत्न करीत असतात तर त्यांचेवरच खोटे आरोप होत गुन्हे दाखल करण्यात येत आहे. अश्याप्रकारे वाळू चोरी करणारे व्यक्तीकडून खोटे गुन्हे दाखल होत असतील तर वाळू चोरी करणारे व्यक्तींना तर मोठा दिलासा पोहचेल व त्यांना वाळू चोरण्यास वाव मिळेल.
तरी प्रविण साळुके यांचेवर खोटे आरोप करुन त्यांना गुन्हयांत फसविण्यात आलेले आहे. अश्याप्रकारे वाळू चोरी करणारे व्यक्ती कडून आपल्या पोलीस ठाणेस प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल न घेता उलट तपासणी करण्यात यावी. अशा प्रकारे आलेल्या खोटया तक्रारीची सत्यता पडताळूनच गुन्हे दाखल करण्यात यावे. तरी प्रविण साळुके यांचे विरोधात खोटी माहिती देत आपल्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. असे वाळू चोरी करणारे व
खोटया माहिती देवून गुन्हे दाखल करणान्यांवर आपले मार्फत कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. तसेच योग्य तो न्याय होण्यास विनंती आहे.

निवेदनावर प्रवीण पाटील,संतोष पाटील,उमेश पाटील,अक्षय सोनवणे, शालिक पाटील,समाधान पाटील,भाऊसाहेब पाटील इ च्या सह्या आहेत.निवेदनाच्या प्रति मा मुख्यमंत्री,महा राज्य,जिल्हाधिकारी,जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव, उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांना देण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button