Amalner

अमळनेर प.स. उपसभापती भिकेश पाटील यांच्या प्रयत्नातून वालखेडा रस्ता दुरुस्त,  परिसरातील नागरिकांनी मानले आभार

अमळनेर प.स. उपसभापती भिकेश पाटील यांच्या प्रयत्नातून वालखेडा रस्ता दुरुस्त, परिसरातील नागरिकांनी मानले आभार

अमळनेर भाजपा च्या वतीने अमळनेर आगारात अमळनेर ते सोनगीर व अमळनेर ते तांदळी अशी बस सेवा सुरू व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले. त्यावेळी आगार प्रमुखांच्या बोलण्यातून मुडी ते वालखेडा हा रस्ता व पूल खूप खराब झाला आहे असे कळले.तालुक्यातील झाडी, लोण, मुडी, एकविरा फाटा, तांदळी या गावांची या रस्त्यावर खूप वर्दळ असते.त्यात दिवाळी सण जवळ आला आहे.

या परिसरातील नागरिकांचा प्रवास जीव धोक्यात घालून सुरू आहे.दिवाळीअसल्याने माहेरी येणाऱ्यांची खूप लगबक सुरू आहे. पांझरा पुलाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.रस्ता व पूल खराब असल्याने बस सेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे. खराब रस्त्यामुळे एन सनासुदीत कुणाचा अपघात होऊ नये या काळजी पोटी जनसेवेसाठी कटिबद्ध असणारे अमळनेर पंचायत समितीचे उपसभापती श्री भिकेश पाटील यांनी रस्ता दुरुस्त केला. आज दि २९ आक्टोबर ला रस्ता दुरुस्ती सुरू झाली. त्यावेळी भिकेश भाऊंनी परिसरातील सरपंच ,उपसरपंच, सर्व सदस्य कार्यकर्त्याच्या, सर्व सन्माननीय ग्रामस्थांच्य एका शब्दावर तात्काळ खर्च मधून जेसीबी मशीन दिले. त्यामुळे खराब झालेला रस्ता बऱ्यापैकी चांगला झाला. रस्ता दुरुस्तीसाठी वालखेडा येथील नागरिकांनीही श्रमदान केले. विकास सोसायटीचे माजी चेअरमन हेमंत सोनवणे ,मोनु चौधरी यांनी आपली वाहने दिवसभर मोफत चालवले.

त्यावेळी प स चे माजी सभापती विजूआण्णा, सरपंच काशिनाथ माळी, माजी उपसरपंच नारायण सूर्यवंशी, भानुदास सूर्यवंशी, नाना चौधरी, ग्रा.प.सदस्य उदय सोनावणे, भाजपायुवा मोर्चा तालुका सरचिटणीस विलास सुर्यवंशी, संतोष चौधरी, गोलू चौधरी , गुणवंत पाटील,एच. एल.पाटील गुणवंत पाटील,हिम्मत पाटील उपस्थित होते.भिकेश पाटलांच्या या रस्ता दुरुस्तीकामामुळे ऐन दिवाळीत सर्वांचा प्रवास सुखकर होणार असल्याने भिकेश पाटलांच्या सोबत परिसरातील नागरिक जोडले जात आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button