Amalner

Amalner: शेतकी संघाच्या जागेवर लवकरच मंगल कार्यालय उभारण्याचे आश्वासन..

Amalner: शेतकी संघाच्या जागेवर लवकरच मंगल कार्यालय उभारण्याचे आश्वासन..

अमळनेर शहर व तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शेतकी सहकारी संघा च्या इमारतीत वरच्या मजल्यावर लवकरच भव्य मंगल कार्यालय उभारण्यात येईल असे आश्वासन शेतकी संघाचे मुख्य प्रशासक श्री संजय पुनाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी हजरत बाबा ताज फाऊंडेशनचे अध्यक्ष रियाज शेख व त्यांचे शिष्ट मंडळाशी चर्चा करताना सांगितले
हजरत बाबा ताज फाउंडेशनच्या वतीने शेतकी सहकारी संघाचे मुख्य प्रशासक यांना सदरील इमारतीच्या वरील भागात सार्वजनिक मंगल कार्यालय उभारण्यात यावे असे मागणीचे निवेदन देण्यात आले सदर निवेदनात म्हटले आहे की शहरातील गांधलीपुरा दर्गा अली मोहल्ला परिसरातील गोरगरीब व गरजू लोकांनासाठी मंगल कार्यालय उभारण्यात यावे जेणेकरून परिसरातील नागरिकांना लाभ होईल यावेळी शेतकी सहकारी संघा चे मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील यांनी सांगितले की लवकरात लवकर माननीय आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरील भागात मंगल कार्यालय उभारण्यात येईल सदरील काम एका वर्षाच्या आत पुर्ण करु असे आश्वासन दिले यावेळी शेतकी संघा चे मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील साहेब व दुसरे प्रशासक अलीम मुजावर, मॅनेजर एस डी पाटील हजरत बाबा ताज फाऊंडेशनचे अध्यक्ष रियाज शेख, अॅड अ.रज़्ज़ाक शेख राष्ट्रवादी कांग्रेस शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, क़मा भाई, प्लंबर , क़मर अली शाह,रहीम मिस्त्री मुस्तफा भाई A to Z मकसुद अली पहेलवान अ.जब्बार भाई, शराफत अली मट्या खाटिक अ.खालीक अहलेकार,अमजद अली शाह, समू वायरमेन ,अलीम शेख अकबर सेट, मुकतार मामु भंगारवाले काले खा पठाण,आबिद अली सैय्यद, सह आदि बांधव उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button