Amalner

Amalner: अमळनेर सह जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह बेमोसमी पावसा ची हजेरी..बळी राजा अडचणीत..!

Amalner: अमळनेर सह जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह बेमोसमी पावसा ची हजेरी..बळी राजा अडचणीत..!

जळगाव : आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे हलक्या ते मध्यम स्वरुपात तुरळक सरींसह बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे.ढगाळ वातावरण, ढगांचा कडकडाट आणि पावसाच्या सरी असे वातावरण मार्च महिन्यात असून याचा फटका शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात बसणार आहे.आज सकाळपासून अमळनेर तालुक्यात तसेच जिल्ह्यातील चोपडा, पारोळा, धरणगाव, एरंडोल चाळीसगाव सह बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे.

खरीप व रब्बी हंगामाच्या मध्ये उन्हाळी हंगामाची पिके घेतली जातात, म्हणजे मार्च ते जून दरम्यान.तीव्र वाढीसाठी त्यांना गरम, कोरडे हवामान आवश्यक असते.आणि फुलांसाठी दिवस मोठे असतात त्यामुळे ते फायदेशीर ठरते.उन्हाळी पीक हे शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचे आहे कारण यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.भोपळा, खरबूज, टरबूज, लौकी, मूग, काकडी, मिरची, टोमॅटो, सूर्यफूल, ऊस, भुईमूग, डाळी, कडू, काकडी इ. पिकांवर ह्या बेमोसमी पावसामुळे वाईट परिणाम होऊ शकतो.

जळगाव जिल्ह्यात मार्चच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा चढला आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३५ अंशापर्यंत गेल्यानेबउकाडा जाणवू लागला. गेल्या दोन दिवसात तापमानाचा पारा चढता असल्याचे जाणवून येत असतानाच मुंबई च्या अरबी समुद्रात पाण्याची पातळी वाढल्याने चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.वातावरणात बदल झाला असून जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून सकाळी ११ वाजे दरम्यान तापमानाचा पार ३५ अंशावर असून किमान २३ अंश तर हवेतील आर्द्रता ३० टक्के असल्याचे दिसून आले आहे.

येत्या दोन दिवसात जिल्ह्याच्या पूर्व भागात फैजपूर, मुक्ताईनगर, रावेर, वरणगाव आदी प्ररीसरात तीन ते पाच मी.मी. तर भुसावळ, बोदवड, जामनेर, यावल आणि जळगाव या तालुक्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ते मध्यम हलक्या पावसाची शक्यता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button