Amalner

अमळनेर प्रताप महाविद्यालयाच्या संघाने विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिंकला फिरता गांधी चषक! निर्भय धनंजय सोनार व जयेश संजय सोनार यांचा संघ ठरला जेता!

अमळनेर : धुळे येथील झेड. बी.पाटील महाविद्यालय आयोजित मानाची विद्यापीठस्तरीय म. गांधी वक्तृत्व स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाचा तृतीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार व द्वितीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी जयेश संजय सोनार यांनी सांघिक विजेतेपद प्राप्त केले. स्पर्धेच्या या ऐतिहासिक 28 व्या वर्षात ,
२० संघ असलेल्या या स्पर्धेत ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व गांधी विचारांची अपरिहार्यता’ या विषयावर त्यांनी प्रभावी मुद्दे मांडून परीक्षक, उपस्थित रसिक व मान्यवरांचे लक्ष वेधत सांघिक प्रथम क्रमांक पटकावला!
तसेच याच विषयावर व्यक्तिगत गटात निर्भय सोनार यास तृतीय तर जयेश सोनार यास चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस देखील मिळाले ! फिरता गांधी चषक, रोख बक्षीस व मानपत्र देऊन त्यांचा झेड बी पाटील विद्यालयाचे मान्यवरांनी गौरव केला.

अमळनेर प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य पी आर शिरोडे, प्रा डॉ रमेश माने, प्रा डॉ नितीन पाटील, डीगंबर महाले, प्रा डॉ संदीप नेरकर, प्रा पराग पाटील, उपप्राचार्य उल्हास मोरे, डॉ जी एम पाटील, सतीश देशमुख, संदीप घोरपडे, प्रा लीलाधर पाटील, रवींद्र विसपुते, श्याम सोनार, महेश निकुंभ, विशाल विसपुते, सुमित विसपुते, गणेश खरोटे, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ तसेच सुवर्णकार समाजाचे वतीने निर्भय व जयेश सोनार यांचे अभिनंदन करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button