Amalner

Amalner: जुगार खेळणारा रंगे हाथ पोलिसांच्या ताब्यात..!

Amalner: जुगार खेळणारा रंगे हाथ पोलिसांच्या ताब्यात..!

अमळनेर तालुक्यात जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जातो. अमळनेर येथील खापरखेडा येथे जुगार खेळताना एका व्यक्तीला मारवड पोलिसांनी रंगेहाथ पकडून कारवाई केल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील खापरखेडा येथील दिलीप श्रावण रायसिंग हा जुगार खेळत होता. यावेळी पो कॉ अनिल राठोड व पो कॉ विशाल चव्हाण यांना गावात सट्टा जुगार घेताना दिसला त्याचवेळी रंगेहाथ पकडून त्याच्या जवळील जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करून मारवड पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button