Amalner

ईद-ए-मिलाद पैगंबर मोहम्मद साहब यांच्या जन्मादिना निमित्ताने आवास बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पारोतोषीक वितरण संपन्न.

अमळनेर ईद-ए-मिलाद पैगंबर मोहम्मद साहब यांच्या जन्मादिना निमित्ताने आवास बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पारोतोषीक वितरण नुकतेच संपन्न.

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. करीम सालार सर यांनी केले आवाहन.

गुणगौरवातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार. स्मिता ताई

गुणवंत विद्यार्थ्यांचा पाठीवर आवासच्या वतीने कौतुकाची थाप. शिरीषदादा

अमळनेर: अमळनेर येथील आवास बहुद्देशीय संस्थेच्या वतीने समाजातील विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि कोरोनाच्या महामारीला लढा देण्यासाठी ज्या सामाजिक कार्यकर्त्याचे योगदान होते अश्या सामाजिक कार्यकर्त्यांचा व शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल असे योगदान देणार्‍यांचा सत्कार व सन्मान चिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मसूद नुरी यांनी कुराण पठन व नात पढली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी या हेतूने, विविध स्तरातून प्राविण्य मिळवून आपल्या समाजाचे नाव उज्वल केलेल्या डाँ फहरीन खान, डाँ निलोफरखान, यांनी बी एच एम एस डिग्री प्राप्त केली तर फीजा मुजावर यांनी बी फार्मसी मध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला अरीबा एफ. खान यांना एम बि बि एस च्या तयारी साठी आणि रेहान जाकीर शेख याने राज्यस्तरीय खेळत विजयी झाल्याबद्दल नुरखान पठाणने छायाचित्रकार परिक्षेत राज्य सरकारने निवड केले आणि एस एस सी बोर्डात ऊर्दू विभागात तालुक्यातून प्रथम फैजान शे रज्जाक, जिया पिंजारी,बुशरा जावेद खाटीक, एस एच सी त सामिया शमसोदीन या विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून ईकरा फाउंडेशनचे अध्यक्ष (मा. उपमहापौर) करीम सालार सर, मा.आमदार साहेब स्मिता उदय वाघ, मा.आमदार दादासाहेब शिरीष चौधरी, अंबादास मोरे साहेब, नगरसेवक सलीम टोपी, नगरसेवक फय्याज पठान, नगरसेवक फिरोज मिस्त्री, नगरसेवक शेख हाजी, नगरसेवक नरेंद्र संदानशिव, नगरसेवक पंकज चौधरी, सत्तार मास्टर, कादर जनाब सह आदी मान्यवर उपस्तीत होते.
सूत्रसंचालन – इब्राहीम सर, असलम सर.
आभार – मो. इकबाल शेख.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आवास बहुउद्देशीय संस्था चे अध्यक्ष अशफ़ाक शेख, सचिव नविद शेख, कोषाध्यक्ष,मजहर शेख, सदस्य अहेमद अली सैय्यद, सदस्य जमालोदीन शेख, सदस्य जाविद पेंटर, सदस्य अमजद अली शाह आदींनी परीश्रम केले…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button