Amalner

Amalner:रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाचे श्रेय इतर कुणी घेऊ नये… माजी आमदार शिरीष चौधरी

Amalner:रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाचे श्रेय इतर कुणी घेऊ नये… माजी आमदार शिरीष चौधरी

लवकरच उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा..

अमळनेर चोपडा रस्त्यावरील वरदान ठरलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे लवकरच माननीय नामदार श्री नितींजी गडकरी साहेब,कॅबिनेट मंत्री ,रस्ता परिवहन भारत सरकार , माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा आमदार माननीय नामदार श्री गिरीश जी महाजन माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा आमदार जामनेर माननीय नामदार श्री उन्मेष दादा पाटील खासदार जळगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच पुलासह तयार झालेल्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांचे झालेल्या कामाचे लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात होणार आहे.सदर कामाची मंजुरी केंद्रीय राज्य मार्ग 2017 18 च्या आराखड्यात माननीय गडकरी साहेबांनी तत्कालीन आमदार शिरीष दादा चौधरी यांनी दिलेल्या काम मागणी पत्रास दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यासाठी सुमारे 30 कोटी इतका भरघोस निधी उपलब्ध करून दिला . निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण मतदारसंघातुन आभार व्यक्त करण्यात आले होते. वेळोवळी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंमळनेर तसेच रेल्वे विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक करून योग्यरित्या काम कसे करता येईल याबाबत चर्चा तथा सूचना देण्यात येत होत्या .सदर कामाचे कार्यारंभ आदेश दिल्यापासून 24 महिन्याच्या आत काम पूर्ण होईल असेही नमूद करण्यात आले व तशी तात्कालीन आमदार या नात्याने सदर कामाचे संबंधित कॉन्ट्रॅक्टरदारास शाब्दिक सूचना देऊन काम योग्यरीत्या पूर्ण व्हावे यासाठी योग्य आणि अभ्यासू अधिकाऱ्यांची नेमणूक नेमणूक करण्यात आली होती.हा रेल्वे उड्डाणपूल दोन राज्यांनासह, दोन राज्यांच्या अडचणी दूर करणारा वरदान ठरेल आणि वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात दूर होऊन अपघातावर कायमचा मार्ग निघेल. त्याचप्रमाणे आरोग्याच्या बाबतीत मोठी मदत होईल ,सदर परिसरातुन या मार्गे साधारण तीस ते पस्तीस हजार लोकांची दररोज वर्दळ सुरू असते. रेल्वे फाटकामुळे होणारी मोठ्या अडचणीवर कायमस्वरूपी मार्ग निघाला ,याबाबत परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष तथा दिनांक 30/9/ 2019 च्या सर्व वर्तमानपत्रात याबाबत तत्कालीन आमदार शिरीषदादा चौधरी सह वरील सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले होते.काम उच्चप्रतीत व्हावे म्हणून कामाची वारंवार पाहणी तसेच जातीने लक्ष घालून आपले आद्यकर्तव्य समजत तत्कालीन आमदार यांनी कामाबाबत योग्य त्या सूचना देण्यात येत होत्या सदर रेल्वे उड्डाणपूल हा जिल्ह्यातच नव्हे तर खानदेशात स्वप्नपूर्ती ठरणारा रेल्वे उड्डाणपूल होता हा रेल्वे उड्डाणपूल लवकरच केंद्रीय मंत्री मा. ना.श्री. नितिन गडकरी साहेब,माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेता देवेंद्रजी फडणवीस साहेब, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील माजी जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन,विद्यमान खासदार उन्मेशजी पाटील यासह अन्य लोकप्रतिनिधींच्या हजेरीत लवकरच लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. सदर कामाबाबत लोकप्रतिनिधीनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रकार करू नये तसेच जनतेची दिशाभूल करू नये असे माझे जाहीर आव्हान आहे.असे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button