Amalner

अमळनेर: पुन्हा मोटरसायकल चोरी..

अमळनेर: पुन्हा मोटरसायकल चोरी..

अमळनेर येथे ललित प्रकाश पाटील (महारु भाऊ) ढेकू बु,अमळनेर हे वाढदिवसाच्या कार्यक्रमास हॉटेल जेपी येथे आले असता त्यांची न्यू होंडा युनिकोन MH-19-DG-5746 रंग काळा रात्री नऊ वाजेच्या सुमारास मोटर सायकल हँडल लॉक तोडून चोरट्यांनी 24 तारखेला पळवून नेली. MH-19-DG-5746 या नंबरची गाडी असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर दिवशी अमळनेर तालुक्यात चोऱ्या होत असून एक दिवसाआड मोटरसायकल चोरी होत आहेत.आता तर दिवसाढवळ्या चोऱ्या होत असून चोरांचे धाडस मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सामान्य नागरिक हवालदिल झाले असून नागरिक एक मिनिट देखील घर मोटरसायकल सोडून जाऊ शकत नाही.जनतेच्या मनात भिती आणि दहशत निर्माण होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button