Amalner

Amalner: मनसे तर्फे दुकानदारांचा सत्कार आणि तंबी देखील…!

Amalner: मनसे तर्फे दुकानदारांचा सत्कार आणि तंबी देखील…!

आज अमळनेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र सरकारने मराठी पाट्या संदर्भात कायदा पारित करून मनसेच्या 2008 या आंदोलनाची पाठराखण करत महाराष्ट्र राज्यात प्रत्येकाने मराठी पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मनसेच्या आंदोलनाचे खरे तर फलित च आहे त्यामुळे हा मनसेचा विजय असल्याने अमळनेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुक्यात जल्लोष साजरा करत प्रत्येक दुकानदार यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व ज्यांनी इंग्रजी भाषेत फलक लावले आहेत त्यांना मनसे मार्फत तंबी ही देण्यात आली. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे), मनसे शहराध्यक्ष धनंजय साळुंके, मनसे सैनिक मुन्ना खाटीक, दर्शन पाटील, अदनाम पिंजारी आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button