Amalner

Amalner: महीला वारी निघाली शेगांवला… ……

Amalner: महीला वारी निघाली शेगांवला… ……

अमळनेर शहरातील जी.एम सोनारनगर येथील संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने महिला वारी शेगांवला रवाना झाली..
सकाळी 5 वाजता संत गजानन महाराज यांची आरती करण्यात आली. अमळनेरात संत गजानन महाराज मंदिरापासून रस्त्यावर महीला शिस्तबद्ध शेगावला वारी वाजत गाजत निघाली. रस्त्यावर महिलांनी रांगोळी काढून रस्त्याच्या दुतर्फाला सजावट करण्यात आली. 24 फेब्रुवारी ते 4 मार्च 2022 पर्यंत शेगाव वारीचे महिला वारीप्रमुख ज्योती पवार यांनी केले आहे.
रस्त्यावरील काही गावात गजानन भक्त व सामाजिक कार्यकर्ते यांनी चहा,नाश्‍ता, जेवण व रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे. महिला वारीमध्ये अमळनेर, डांगरी, सात्री, भिलाली, सबगव्हाण ,कावप्रिपी, खापरखेडा, करणखेडा, मुसळी ,धरणगाव येथील 100 महिलांची पायीवारी शेगांवला गेली. तुळशीपूजा सुवर्णा साळुंखे, विनादारी सरला चव्हाण, प्रा आर. बी पवार, वारीप्रमुख ज्योती पवार,वैद्यकीय सेवा डॉ जिजाबराव पाटील, प्रवीण पवार, हिराबाई पाटील,उर्मिला जगताप ,वंदना शिसोदे ,श्रीकृष्ण चव्हाण ,लहुकांत पाटील प्रवीण पवार,नितीन भावे,रघूनाथ पाटील सह अनेक महिला पुरुष वारीत सहभागी झाले. सकाळी संत गजानन महाराजांची आरती करण्यात आली. वाडी संस्थानमध्ये महिलांची पायी वारी जात त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेत त्या ठिकाणी सर्व महिलांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.
विद्याविहार कॉलनी, सप्तशृंगी कॉलनी, पटवारी कॉलनी, सुरभी कॉलनी जी.एम.सोनार नगर येथील सर्व महिलांनी पालखीचे दर्शन घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button