Amalner

Amalner: संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे ६४५ वी जयंती महिला मंडळाने केली साजरी…

Amalner: संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे ६४५ वी जयंती महिला मंडळाने केली साजरी…

अमळनेर येथील बुधवार रोजी श्री संत शिरोमणी रोहिदास यांच्या ६४५ व्या जयंती निमित्त संत रोहिदास विकास फाऊंडेशन तर्फे अमळनेर शहरात पहिल्यांदाच ढेकू रोडवरील भिलाटी परिसरातील गरीब चिमुकल्यांना खाऊवाटप करण्यात आले. तसेच भक्ति शक्ती चौक आवारात महिला संघटनने संध्याकाळी जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सदानंद अहिरराव होते कार्यक्रमाचे अध्यक्ष अमळनेर तालुक्यातील तहसीलदार मिलिंद रामदास वाघ हे होते. जयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवातीला दीप प्रज्वलन तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या हस्ते करण्यात आले व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात चर्मकार समाजातील संत रोहिदास फाउंडेशनचे नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र सोबत वृक्ष वाटप करण्यात आले. या जयंती निमित्त संत रोहिदास फाऊंडेशनचे महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा शारदा उंबरकर यांनी आजची सामाजिक परिस्थिती व रोहिदासांच्या विचांरावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. खान्देश महिला प्रमुख उषा ताई देवरे यांनी रोहिदासांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले तर तालुका महिलाध्यक्ष मीना क्षीरसागर यांनी राबविलेल्या उपक्रमावर मत प्रकट करतांना आणखी महिलांनी सक्षम कसे व्हावे यावर मार्गदर्शन केले. तालुकाध्यक्ष दिनेश मोरे यांनी समाज एकत्र येऊन संघटन कसे करता येईल यावर विचार व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद रामदास वाघ यांनी समाजाचा उत्तम नागरिक कसा बनता येईल व मानवता हाच धर्म आहे या विचारांनी त्यांनी समाज बांधवांना मोल्याचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा शारदा उंबरकर यांनी केले. आभार तालुकाध्यक्ष मीना क्षीरसागर यांनी व्यक्त विशेष सहकार्य खान्देश संम्पर्क प्रमुख प्रभाकर क्षीरसागर व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने व समाजबांधवांच्या उपस्थितीने संत शिरोमणी रोहिदास जयंती साजरी करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button