Amalner

Amalner: खा शि निवडणूक… मतदारांनी 8 मते देणे बंधनकारक..! वाचा पूर्ण नियम…

Amalner: खा शि निवडणूक… मतदारांनी 8 मते देणे आवश्यक..! वाचा पूर्ण नियम…

अमळनेर उद्या दि 13 फेब्रुवारी2021 रोजी खानदेश शिक्षण मंडळाची निवडणूक असून मतदारांसाठी महत्वाची सूचना आहे…

खा.शि.मंडळाची निवडणूक दि. 13/02/2022 रोजी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे सकाळी 8.00 ते 5.00 या वेळेत घेण्यात येत आहे. तरी सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा ही विनंती.
त्यासाठी 12 बुथची व्यवस्था केलेली आहे. मतदानास येणा-या प्रत्येक मतदार सभासदाने सोबत फोटो ओळखपत्र आणणे व मारक परिधान करून येणे आवश्यक (अनिवार्य) आहे.तसेच सोबत कोविड प्रतिबंधक डोस घेतल्याचे प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक आहे त्याशिवाय मतदान करता येणार नाही. ओळखीसाठी शासन मान्यता प्राप्त असलेले ओळखपत्र (आधार कार्ड,मतदान कार्ड, पॅन कार्ड, इत्यादी)आणावे. अध्यक्ष पदासाठी एक, विश्वस्त पदासाठी एक व उपाध्यक्ष पदासाठी दोन मते अनिवार्य आहे त्यापेक्षा कमी किंवा जास्त मते दिल्यास
मतपत्रिका बाद होईल.तसेच कार्यकारी मंडळ सदस्य पदासाठी आठ मते देणे अनिवार्य आहे. त्यापेक्षा कमी किंवा अधिक मते दिल्यास मतपत्रिका बाद होईल याची सर्व सभासद बंधू-भगिनी यांनी नोंद घ्यावी.

मतदारांना महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातुन प्रवेश देण्यात येईल व महाविद्यालयाच्या कार्यालयासमोरील प्रांगणात वाहन पार्किंग करून मुख्य प्रवेशद्वारातुन संख्याशास्त्र विभागाकडून मतदान केंद्रात प्रवेश करून मतदान झाल्यावर मतदारास सायकल स्टैंड बाजूच्या रस्त्याने किंवा प्रताप हॉस्पिटलच्या समोरील प्रवेशद्वारातुन बाहेर जाण्याचा मार्ग राहील.
तसेच सर्व उमेदवार व मतदारांनी शासन नियमानुसार कोरोनाचे नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. मतदान केंद्रावर येतांना सामाजिक अंतर राखणे, मास्क परिधान करणे, हात धुणे अनिवार्य आहे. याची सर्व उमेदवार व मतदारांनी नोंद घ्यावी.अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी पंडित चौधरी यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button